How to check Ration card details on mobile आपल्या गावात आपण रेशन दुकानातून रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. अनेकदा सर्व्हर डाऊन झाले म्हणून तो पावतीच्या मागच्या बाजूला पेनाने आकडे लिहून तसे धान्य वाटप करतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या ऑनलाईन पाहता येण्यासाठी एक वेबसाईट चालू केली आहे. आपण http://mahaepos.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला दहाअंकी आरसी क्रमांक जो रेशन घेताना बायोमेट्रिकसाठी येतो. आपल्या रेशनकार्डवरील असतो तो क्रमांक यामध्ये टाकावा लागतो. त्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे, महिन्याला कोणी रेशन आणले त्याचे नाव, त्याला किती गहू व तांदूळ दिले याची माहिती निदर्शनास येत आहे.
याशिवाय आपल्या गावातील रेशन दुकानदाराने गावासाठी किती माल आणला आहे, हे देखील ही संकेतस्थळ दाखविते. या वेबसाईटवर प्रत्येक महिन्यात पावतीवरील धान्य आणि प्रत्यक्षात दुकानदाराने दिलेले धान्य यामध्ये तफावत आढळल्यास यासाठी तक्रार देण्यासाठीही एक संकेतस्थळ तसेच 1800-22-4950 व 1967 या क्रमांकावर टोल फ्री सुविधा आहे. बायोमेट्रिक प्रणालीमुळे आपल्या नावावर शासनाकडून किती धान्य येते आणि आपल्याला किती धान्य मिळते हे आपल्या मोबाईलवर समजत असल्यामुळे धान्याचा काळाबाजार कमी होणार असून, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 .
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन शोधण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
या वेबसाईटवर उजवीकडील ऑनलाईन सेवा या रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला मराठीत माहिती दिसून येईल.
त्यानंतर वरच्या बाजूच्या साईन इन किंवा रेजिस्टर या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्यायांपैकी तुम्हाला सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत.
रेशन कार्ड ऑनलाईन कसं पाहायचं?
आता एकदा का तुम्हाला तुमचा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.
त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.
स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे.
यावर क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर, नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसंच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं, याची माहिती दिलेली असते.
आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे रेशन कार्ड तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही. तशी स्पष्ट सूचनाच इथं दिलेली आहे. ही सुविधा तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन बघता यावं, केवळ यासाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
How to check Ration card details on mobile रेशन कार्डवर धान्य किती मिळते? व ते कसे पाहायचे ही माहिती कशी वाटली, ती कमेंट करून नक्की सांगा.