How to change photo background on mobile | मोबाईलमध्ये फोटोचे बॅकग्राऊंड कसे बदलायचे?

How to change photo background on mobile आम्ही तुमच्या करिता खास घेऊन आलो आहे फोटो एडिटिंगची कमाल….

आता घरबसल्या आपल्या मोबाईल मध्ये फोटो क्लिक करून जिथे वाटेल तिथे आपण फोटो काढू शकतो. तो कसा त्याविषयी माहिती पाहूया.

पुष्कळ जाणाना आपला फोटो वेगवेगळ्या ठिकाणी काढावा असं वाटत असते मग ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया असो, दिल्लीतील ताजमहाल असो, अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असो किंवा पॅरीसमधील आयफिल टॉवर असो अशा पर्यटन ठिकाणी गेल्यावर या पर्यटनस्थळांसमोर आपण फोटो काढतो. आपल्या फोटोत बॅकग्राऊंडला या वास्तू दिसतात.

आता मोबाईल मध्ये  Mobile photo background change मुळे तुम्हाला तुमच्या फोटोत मागे अशा वास्तू किंवा इतर कोणतंही ठिकाण हवं असेल तर स्वतः त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. How to change photo background on mobile अगदी घरबसल्या फक्त मोबाईलमध्ये क्लिक करून तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणासमोर फोटो काढू शकता.

प्रत्यक्षात या स्थळावर न जाता त्या ठिकाणी आपला फोटो हवा असेल तर आपल्याला बॅकग्राऊंड एडिट करण्याचं ऑप्शन असतं. पण शक्यतो अशा एडिटिंगसाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर लागतात. बहुतेक मोबाईलमध्ये असं ऑप्शन नसतं. पण आता डोंट वरी, तुमच्याकडे कोणताही अँड्रॉईड फोन असेल तरी तुम्ही असं बॅकग्राऊंड चेंज करू शकता. यासाठी 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत.

तर चला मग पाहूया या विषयी माहिती.

वेबसाईटच्या माध्यमातून बॅकग्राऊंड हटवणं:
जर तुम्हाला फक्त एकदा बॅकग्राऊंड हटवायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी तुम्हाला कोणताही मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. तुम्हाला अँड्रॉईड मोबाईल वेब ब्राऊझरवर जावं लागेल.  ज्यामार्फत तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडला हटवू शकता.

यासाठी अँड्रॉईड फोनमधून वेब ब्राऊझरमधून https://www.remove.bg/upload या वेबसाइट वर जाऊन इमेज अपलोड बटणावर क्लिक करा. समोज एक इमेज विंडो ओपन होईल. त्यापैकी ज्या फोटोचा बॅकग्राऊंड तुम्हाला बदलायचा असेल, तो सिलेक्ट करा आणि डन बटणावर क्लिक करा. किंवा तुम्ही रिअल टाइम फोटोही क्लिक करू शकता.

See also  Fort in Maharashtra महाराष्ट्रातील किल्ले

वेबसाईटवर तुम्ही ऑटोमॅटिकली दुसऱ्या विंडोवर जाता ज्यात तुमच्या फोटोला बॅकग्राऊंड नसतो. त्यानुसार खाली देण्यात आलेल्या सूचनेनुसार विंडोच्या वर उजव्या बाजूच्या डाऊनलोड आयकॉनवर क्लिक करा. हा फोटो तुम्ही शेअर करून थेट शेअर करू शकता किंवा डाऊनलोड करू शकता.

वेब ब्राऊझरवरून बॅकग्राऊंड कशी बदलावे :
जर तुम्हाला बॅकग्राऊंड बदलायचा असेल तर तुमच्या अँड्रॉईड फोनमधील वेब ब्राऊझरमधील https://www.remove.bg/upload वेबसाईटवर जा.

नंतर तुम्ही नवा फोटो अपलोड करून त्याचा बॅकग्राऊंड हटवून बॅकग्राऊंड चेंज करू शकता किंवा बॅकग्राऊंड हटवलेला फोटो थेट अपलोड करू शकता.

एडिट ड्रॉप-डाउन आइकॉनवर क्लिक करा आणि प्रिव्ह्यू ऑप्शन निवडा.

रिमूव्ह वेबसाइटमध्ये तुम्हाला फोटोचा बॅकग्राउंड ब्लर करणं, इमेज बॅकग्राउंड, फोटो बॅकग्राउंड म्हणून एक डार्क कलर निवडण्याचा ऑप्शन असतो.  आवश्यक बदलानुसार वेबसाइट इंटरफेसच्या टॉप कॉर्नरला डाउनलोड आइकनवर क्लिक करा.

तुम्ही फोटो शेअर करू शकता किंवा डाऊनलोड करू शकता.

Remove.bg अॅपमार्फत बॅकग्राऊंट कसे हटवायचे :
जर तुमच्याकडे असे बरेच फोटो आहेत ज्याचे बॅकग्राऊंड बदलाचे आहे, त्यावेळी  Remove.bg हा अॅप ऑप्शन आहे. अँड्रॉईड फोनवर हा अॅप डाऊनलोड करा.

Picsart App वरून बॅकग्राऊंड कसे हटवायचे :
बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी Picsart चा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. Picsart सारखा फोटो एडिटिंग अॅप्सचा वापर करू शकता.  यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. हा अॅप फोनवर डाऊनलोड करा. ओपन करून Picsart इंटरफेसमध्ये अॅड आयकॉनवर क्लिक करा.  त्यानंतर एडिट एक फोटो ऑप्शन निवडा. ज्या फोटोचा बॅकग्राऊंट बदलायचा आहे, तो निवडा किंवा रिअल टाइम फोटोही क्लिक करू शकता.

एडिटिंग एरियामध्ये दिलेल्या हायलाइटनुसार रिमूव्ह बीजी ऑप्शनवर क्लिक करा. इथं तुम्हाला फोटाच बॅकग्राऊंड म्हणून एक डार्क कलर किंवा इतर फोटो सेट करण्यासाठी डिव्हाइस मिळतं. आता डाऊनलोड आयकॉनवर क्लिक करा. फोटो तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह होईल.

मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा व तुम्ही सुद्धा याचा उपयोग या व इतरांनाही शेअर करा.

See also  Business Ideas for Housewife|महिला उद्योजकांसाठी व्यवसाय कल्पना|small business ideas for housewives in india

Leave a Comment