Grampanchayat Karmchari Vetan 2022 – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दर लागू करणेबाबत शासन निर्णय दि. 22 जून 2022 रोजी ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरवण्याचे अधिकार आहेत. 1948च्या तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायत कामधंदा या रोजगारात असलेल्या कामगारांना देय असलेले किमान वेतन दर शासन अधिसूचनेनुसार निर्धारित केले जातात त्या अनुषंगाने 10 ऑगस्ट 2020 रोजी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे त्यानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या 10 ऑगस्ट 2020 च्या अधिसूचनेनुसार ऊन सुधारित दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 10 /8/ 2020 रोजी च्या आधी सूचनेला अनुसरून कर्म कामगारांची वर्गवारी व परिमंडळ निहाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मूळ किमान वेतन दर खालील प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2022 पासून पुनरनिर्धारित करण्यात येत आहेत.
विभागाचे शासन निर्णय दिनांक चार मार्च 2014 दिनांक, 17 सप्टेंबर 2018 अन्वये निर्गमित केलेल्या अटींच्या अधीन राहून कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी अनुज्ञेय शासन हिस्सा देय राहील सदरचा खर्च मागणी क्रमांक एल- 2 , 2053 जिल्हा प्रशासन सात एक ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान 31 सहाय्यक अनुदान (2053, 1042) वेतनेत्तर या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदी मधून करण्यात येईल.