Gram Sevakache Adhikar Kartavya information in Marathi language | ग्रामसेवकाचे अधिकार व कर्तव्य

Gram Sevakache Adhikar Kartavya information in Marathi language ग्रामपंचायतीचा काराभर पाहण्यायसाठी ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंयातीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व काराभारावर त्याचे नियंत्रण असते. तो जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याची नेमणुक मुख्ये कार्यकारी अधिकारी जि. प. करतात. त्याची बदली करण्याचा अधिकार जि.प. लाच आहे. काहीवेळा ग्रामसेवकाकडे दोन किंवा तीन ग्रामपंचायतींची जवाबदारी सोपविण्यात येते. म्हणूनच ग्राम सेवकाला ग्राम विकास अधिकारी village department officer असेसुद्धा म्हटले जाते. चला चला मग पाहूया ग्रामसेवकाचे अधिकार व कर्तव्य या विषयी माहिती.

ग्रामसेवकाचे कामे, अधिकार, कर्तव्य | Gram Sevak work

ग्रामसेवकाला गावाच्या विकासचेकामाचे नियोजन करणे, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, ग्रामसभांच्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ग्रामसभेचे पत्र व्यवहार आणि शासकीय योजनेचे व्यवस्थापन अशी अनेक कामे व जबाबदारी पार पाळावी लागते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 प्रमाणे ग्रामसभेचा कामकाज चालवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. शासनाकडून कडून मिळणाऱ्या अनुदानातून सरपंच व ग्रामसभा सभासद यांच्या सहकार्याने गावाच्या विकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.

ग्रामपंचायतीचे विकासच्या कामाचा अहवाल तयार करणे आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावणे.
सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी गरज असेल तर कायदेविषयक सल्ला देणे.

ग्रामपंचायतीच्या कामाची सर्व माहिती जतन करणे व सरपंचाच्या साह्याने गावाची विकासाची कामे करणे.

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सर्व अभिलेख जतन करून ठेवणे व त्यांना अद्ययावत ठेवणे.

शासनाने निर्धारित केलेले विविध करांची वसुली करणे. प्रत्येक चार वर्षांनी कर आकारनित वाढ सुचविणे आणि ग्रामनिधीची संपूर्ण जबाब दरी संमभाळने.

ग्रामपंच्यातीतील कर्मचार्याचे कामावर नियंत्रण ठेवणे त्याचे भत्ते व भविष्य निर्वाह निधी शासनाच्या कायद्यानुसार व नियमानुसार देणे.

गावातील दरिद्रीरेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे ही सुद्धा ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. सरकारच्या वेगवेगळ्या विकाशाच्या योजना बद्दल जनजागृती करणे व ते राबवणे.

See also  Not Only Pant But 8 Players of Team India Suffering From Injuries, DEXA's Challenge In Team Selection | पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान

ग्रामपताडीवर प्रशासन चालवण्याचे महत्वाचे काम ग्रामसेवक करतो सरपंच तसेच उपसरपंच यांना मार्गदर्शन करणे तसच कनिष्ट ग्रामपंच्यायातीतील क्रमचार्याना मार्गदर्शन करणे हे सुधा ग्रामसेवकाचे कर्तव्य आहे.

पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे ग्रामसेवकाचे कर्तव्य

ग्रामीण जनतेचे दैनंदिन व्यवहारात नित्याचा व प्रत्यक्ष संबंध येणारे शासकीय कर्मचारी तलाठी आणि ग्रामसेवक येत असतात. ग्रामसेवकाने आपल्या कार्याद्वारे लोकांचा विश्वास संपादन केला तर विकासाच्या अंमलबजावणीत लोकांचे सहकार्य मिळवणे त्यांना सहज शक्य होते. ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य यांना ही त्यांच्या कामात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अनुभवी नसतील तर त्यांना ग्रामसेवकाच्या सहकार्यावर अवलंबून रहावे लागते. अशा वेळी ग्राम पातळीवर विकासापर्यंत गती देण्यात आणि त्यांची यशस्वीरीत्या पूर्तता करण्यात ग्रामसेवक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

ग्रामसेवकाबाबतच्या तक्रारी

ग्रामसेवकाची जबाबदारी खूप मोठी असली तरी ती काहीशा प्रमाणात पूर्ण केली जात नाही. अनेक कामे पूर्णत्वला न नेल्यामुळे ग्रामसेवकाविरुद्ध ज्या तक्रारींमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की, तो गावातील लोकांना फारसे उपलब्ध होत नाही. याचे कारण असे की ग्रामसेवक हा सहसा आपल्या नोकरीच्या गावी वास्तव्यास नसतो, त्यामुळे तो आपल्या सोयीनुसार नोकरीच्या गावी येतो. अशा स्थितीत ठराविक वेळी तो लोकांना भेटेलच याची खात्री नाही.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावातील काही ठराविक लोकांची मर्जी सांभाळली की सामान्य लोकांची कसेही वागले तरी चालू शकते. हे त्याने अनुभवाने ओळखले असते त्याप्रमाणे कृती होत असते. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार किंवा आर्थिक गैरव्यवहार यात बऱ्याच वेळा ग्रामसेवकाचा सहभाग असतो. काही प्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी एकमताने ठरवून भ्रष्टाचार केल्याचे ही उदाहरणे आहेत.

याशिवाय ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्नही ग्रामसेवकाकडून केला जातो. अपवाद वगळता किती ग्रामसेवकांनी अनेक गावे परिपूर्ण व समृद्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका केली आहे. त्यामुळे ग्रामसेवक आपली भूमिका आणि कर्तव्य पार पाडण्यात किती प्रामाणिक आहे. यावरही त्यांच्या भूमिकेचा महत्त्व अवलंबून असते.

See also  शनिवारी का करतात हनुमानजीची पुजा Hanuman

ग्रामसेवकाचे अधिकार व कर्तव्य ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

Leave a Comment