Gram Panchayat Maharashtra | ग्रामपंचायत महाराष्ट्र |

Gram Panchayat Maharashtra | ग्रामपंचायत महाराष्ट्र | नमस्कार मित्रांनो, मराठी बातमीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या सर्वांसाठी रोज नवनवीन योजना व बातम्या आम्ही घेऊन येत असतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाची योजना आज आम्ही घेऊन आलो आहे. ती म्हणजे ग्रामपंचायत प्रमाणपत्र म्हणजेच ग्रामपंचायतीत सर्व दाखले कागदपत्रे आता तुम्हाला मोबाईलवरच मिळणार पण कसे ? आता ते आपण या लेखांमध्ये पाहूया.
ग्रामपंचायत प्रमाणपत्र : मंडळी ग्रामपंचायत असलेल्या सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आज आलो आहोत.  आता ग्रामपंचायत मधले सर्व दाखले काढण्यासाठी आपल्याला नेहमी ग्रामपंचायत मध्ये जावे लागत असे व त्यामुळे  आपल्याला ग्रामपंचायत मध्ये नेहमी जावं लागत होते व त्यासाठी आपल्याला खूप पायपीट करावी लागत होती. मात्र आता तुम्हाला असे करण्याची गरज पडणार नाही. कारण हे सगळे दाखले तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरच मिळणार आहेत. परंतु ते कसे मिळतील हे आपण जाणून घेऊया. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. व तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ग्रामपंचायत प्रमाणपत्र गावाचे विकासाचे मुख्य केंद्र म्हणजे गावाचे ग्रामपंचायत असते. या ग्रामपंचायतीकडून आपल्याला अनेक प्रकारचे दाखले मिळतात जसे की मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, जन्म दाखला, पाणीपट्टी, घरपट्टी दाखले व विविध उतारे पण हेच ग्रामपंचायत दाखले तुम्ही आता मोबाईलवर पाहू शकणार आहात.
ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईलवर पाहण्यासाठी
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करावे लागेल.
  • त्यानंतर महा इ ग्राम(Maha-E-Gram) हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचे आहे.
  • इन्स्टॉल केल्यानंतर ती ओपन केल्यावर संपूर्ण ऑप्शन अलाव करायचे आहेत.
  • ऑप्शन्स Allow केल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे काढता येणार आहेत.
  • कागदपत्र काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या जन्माचा दाखला किंवा इतर दाखला हा पर्याय दिसेल.
  • यात तुम्ही जन्मदाखला यावर क्लिक करा.
  • यानंतरच तुम्हाला विविध पर्याय दिसतील यात मृत्यू नोंदीचा दाखला, जन्म नोंदीचा दाखला, विवाह नोंदणीचा दाखला तसेच दारिद्र रेषेखालील दाखलाही पर्याय येतील.
महाग्राम सिटिझन कनेक्ट
ही कागदपत्रे तुम्हाला मिळवायचे असतील तर यासाठी सगळ्यात आधी Maha-e-Gram Citizen Apk येथे नोंदणी करावी लागेल त्यानंतर कागदपत्रे काढताना तुम्हाला सर्वप्रथम जन्माचा दाखला किंवा दाखले प्रमाणपत्र ही ऑप्शन तेथे तुम्हाला दिसेल. यामध्ये आपण जन्म दाखला या ऑप्शन वर क्लिक करावे. व त्यानंतर तुम्हाला विविध पर्याय तेथे उपलब्ध होतील. त्यामध्ये जन्मात नोंदीचा दाखला, मृत्यू नोंदीचा दाखला, विवाह नोंदीचा दाखला, व दारिद्र रेषेखालील दाखला ही कागदपत्रे तुम्हाला तेथे दिसते. हे आपण काढू शकता व त्याचबरोबर घरपट्टी किंवा पाणीपट्टी ही सुद्धा तेथे उपलब्ध राहील व त्याचबरोबर आपले सरकार सुविधा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता तुम्ही सर्व माहिती एका ॲपच्या माध्यमातून मिळू शकता किंवा दाखले प्रमाणपत्र आहे ही आता ही महाई ग्रामच्या साह्याने मिळू शकता.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

 

See also  These Citizens Will Get Free Travel of ST Bus From Today | या नागरिकांना आजपासून एसटी बसचा मोफत प्रवास मिळणार आहे |

Leave a Comment

error: Content is protected !!