Gram Panchayat Andajpatrak information in Marathi language प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या गावासाठी अंदाजपत्रक बनवावे लागते म्हणजे पुढील वर्षाकरिता ग्रामपंचायतीला काय काय कामे करायची आहेत. याविषयी लिहिणे म्हणजे अंदाजपत्रक होय. ही कामे गावातील लोकांकडून सांगितली जातात आणि ही कामे अंदाजपत्रकामध्ये लिहून 31 डिसेंबर च्या आत पंचायत समितीकडे पाठवावी लागतात. त्यानंतर पंचायत समिती हे अंदाजपत्रक राज्य सरकारकडे पाठवते. त्यानंतर राज्य सरकार त्या गावची लोकसंख्या किती आहे. हे पाहून त्यासाठी निधी मंजूर करते आणि आपल्याला पुढील वर्षांमध्ये मध्ये हा निधी मंजूर होतो.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 62 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीला हा अर्थसंकल्प विहित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी व विहित नमुन्यात दरवर्षी पंचायत समितीला सादर करावा लागतो. या अर्थसंकल्पात निधीतील सुरुवातीची शिल्लक पुढील आर्थिक वर्षाची ग्रामपंचायतीची अंदाजे प्राप्ती व आस्थापना तसेच आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी योजनेला खर्च तसेच जिल्हा ग्रामविकास निधी दिला. द्यावयाच्या अनुदानाची रक्कम इत्यादी तपशील असतो. प्रत्येक वर्षी पुढील वर्षाचे अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प तयार करण्यात येते. सरपंच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेची मान्यता देऊन सदर अंदाजपत्रक ग्राम सभेमध्ये मंजूरीसाठी सादर करतात.
ग्रामपंचायत अंदाजपत्रक विषयी ठळक मुद्दे :
1) ग्रामपंचायतीने अंदाजपत्रक विहित मुदतीत ग्रामसभेची मान्यता न घेतल्यास ग्रामसेवक किंवा सचिव यांना अनिवार्य खर्चाचे विवरण तयार करून व पंचायत समिती सादर करायचे असते.
2) सरपंच आणि विहित मुदतीत अंदाजपत्रकास मान्यता न घेतल्यामुळे त्यांचे विरुद्ध अपात्रतेची कारवाईची तरतूद कायद्यात आहे.
3) ग्रामपंचायतीला सदस्य व पदाधिकारी यांच्या मदतीने नियोजन करून 31डिसेंबर पुरी ग्रामसभेची मान्यता घेऊन ते पंचायत समितीकडे मान्यतेसाठी सादर करावयाचे असते.
4) ग्रामपंचायतीची आर्थिक वर्षात एकापेक्षा अधिक वेळी पुरवणी अंदाजपत्रक करण्याचा अधिकार आहे.
5) पुरवणी अंदाजपत्रक म्हणजे काय?
पंचायत समितीने मान्य केलेल्या अंदाजपत्रकात या आर्थिक वर्षात कोणत्याही वेळी ग्रामपंचायतीला सुधार किंवा दुरुस्त करता येईल किंवा पुरवणी अंदाजपत्रक अहवाल सादर करता येईल. पंचायत समिती पुरवणी अंदाजपत्रकाचा हा मूळ अंदाजपत्रकास विचारात घेऊन मान्यता देण्यात येते.
ग्रामपंचायत अंदाजपत्रक तयार करतेवेळी घ्यावयाचे मुद्दे:
ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये घरपट्टीच्या वाढीव दरामुळे बऱ्यापैकी वाढ झाली आहे. पंचायतीच्या उत्पन्नच्या बाबी पासून किती उत्पन्न मिळणार आहे व ते कोणत्याही बाबीवर खर्च करावयाचे आहे याचा विचार केला तरच आर्थिक शिस्त पाळली जाते.
2) राज्य शासनाचे पंचायतीच्या अंदाजपत्रका प्रमाणे काही नियम केलेले आहेत. त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे.
3) ग्रामपंचायतीने दरवर्षी 31 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी नमुना नं. 1मध्ये अंदाजपत्रक तयार करून ते पंचायत समितीला सादर करावयाचे असते.
4) जर ग्रामपंचायत अंदाजपत्रक तयार करून सादर करू शकत नसेल तर पंचायतीच्या चिटणिसाने तयार करून वरील प्रमाणे सादर करावे.
5) पंचायतीला नमुना नं 1 मध्ये नमूद केलेल्या बाबी पासून मिळणारे उत्पन्न व खर्चाची अंदाजे व्याप्ती याचे विवरण देणेचे आहे.
6) अंदाजपत्रकामधे पंचायतीच्या आस्थापनेवरील खर्च, ग्रामनिधीत द्यावयाचे अंशदाम, ग्राम निधीतून कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड, मागासवर्गीयांवर करावा लागणार 10% खर्च पिण्याच्या पाण्याची नळ योजना, विदयुत पंप, हातपंप दुरुस्त करणेसाठी जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्ती शीर्षकामधे जमा करणेची रक्कम T.C.L खरेदीसाठी लागणारी रक्कम याचा काळजीपूर्वक अंदाजपत्रक समितीला सादर करायचे असते.
भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 5983 जागा
7) पंचायत समितींने असे प्राप्त झालेले ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक त्यात फेरबदल करून मान्य केले पाहिजे.
8) ग्रामपंचायतीला पुर्नविनियोजना अंदाजपत्रक तयार करता येते. मात्र त्याला वरील प्रमाणेच पंचायत समितीची मान्यता द्यावी लागेल.
9) अशा रीतीने पंचायत समितीने मान्य केलेल्या अंदाजपत्रकातील बाबीवर पंचायतीला खर्च करता येईल.
10) राज्य शासनाने ग्रामसभेला महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे असे तयार केलेले अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे माहितीसाठी ठेवायचे आहे.
ग्रामपंचायत अर्थसंकल्प व लेखे कायदा :
ग्रामपंचायतीच्या हिशोबाचे वर्ष 1 एप्रिल पासून सुरु होते व 31 मार्चला संपते.
2) सचिवाने पंचायतीचे वार्षिक हिशेब प्रतिवर्षी १ जुन रोजी किंवा तत्पूर्वी विहित नमुन्यात (न. नं. 3 व 4 मध्ये) पंचायत समिती व जिल्हा परिषदेस सादर करण्याचे असतात
3) ग्रामपंचायत निधीतून 500 रुपयांपेक्षा अधिक असलेले प्रदान (खर्च) धनादेशाद्वारे (चेकने) करण्यात येईल.
4) प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामनिधीचे हिशेब कलम 62 नुसार खालील नमुना नं 1 ते 27 मध्ये ठेवले पाहिजेत.
Gram Panchayat andajpatrak information in Marathi language ग्रामपंचायत अंदाजपत्रक विषयी माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.