Farm Loan Waiver |शेती कर्जमाफी |
शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपल्या राज्यामध्ये जी कर्जमाफी होणार होती त्या यादीमध्ये राज्यातील सहा लाख शेतकरी अडकलेले आहेत. आणि हल्लीच सरकार बदललेले आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी अडकलेली आहे. जे सरकार पहिले महाराष्ट्रामध्ये स्वतःची सत्ता गाजवत होती त्यांनी जुन्या कर्जमाफी योजना चालू केली होती व जेव्हापासून नवीन सरकार आले त्यांनी एक नवी योजना शेतकऱ्यांसाठी काढली त्या योजनेचे नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना. आज पर्यंत पूर्ण तीन वर्षे झाली आहेत. ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज माफ होणार होते. त्यांचे पैसे आणखीही त्यांच्या खात्यामध्ये आले नाहीत.
शेतकऱ्यांना 59 कोटी कर्जमाफी मिळणार होती.
या योजनेच्या अंतर्गत जे शेतकऱ्यांना 5900 कोटी कर्जमाफी मिळणार होती ते मिळालीच नाही. महाराष्ट्राचे नवीन सरकार म्हणजे एकनाथजी शिंदे व फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये तरी शेतकऱ्यांना त्यांची ठरलेली कर्जमाफी रक्कम ही मिळावी आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मधून अनुदान मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पण यावर सध्या कोणताही शासनाकडून निर्णय आलेला नाही. शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये उभे राहून कर्जमाफी विभागाने राज्य शासनाकडे वारंवार अहवाल सादर केला आहे मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे यावर्षी नवीन सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली होती . या योजना चालू झाल्यापासूनच अनेक प्रकारच्या अडचणी आल्या आणि विविध याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. मात्र अजूनही सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही.