Pradhanmantri Garib Kalyan Ann Yojana | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.
Pradhanmantri Garib Kalyan Ann Yojana | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. :-
हा निर्णय घेतल्यामुळे गरिबांचा आर्थिक ताण कमी होईल. आणि त्यांना दिलासा मिळेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी असे म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून कल्याणकारी योजनेच्या लाभार्थी गरिबा प्रति माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशीलता दर्शवणारा निर्णय आहे. असे पियुष गोयल यांचे म्हणणे आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जाईल व तसेच अंतोदय अन्न योजनेअंतर्गत ३५ किलो धान्य हे प्रती कुटुंब एका वर्षासाठी मोफत देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये अनुदानित अन्नधान्य हे तीन रुपये प्रति किलो तसेच तांदूळ दोन रुपये प्रति किलो एक रुपये प्रति किलो आणि भरड धान्य लाभार्थ्यांना वितरित केले गेले आहे. व तसेच लाभार्थ्यांना यापुढेही मोफत अन्य धान्य मिळणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे असं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या योजनेअंतर्गत २८ महिने मोफत धान्य वितरण करण्यात आले अशी देखील माहिती त्यांनी दिली आपल्या देशात महामारीचा प्रकोप म्हणजेच कोरोना काळ सुरू असताना सरकारने शेतकऱ्याकडून विक्रमी हमीदाराने मोठी अन्नधान्य खरेदी केल्यामुळेच ही योजना राबवणे शक्य झाले आहे व तसेच आपल्या देशातील शेतकऱ्यांनी देखील या काळात विक्रमी अन्नधान्य उत्पादन केल्यामुळे या योजनेच्या यशाचे पूर्ण शेतकऱ्यांना द्यायला हवा. (Pradhanmantri Garib Kalyan Ann Yojana | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.)