दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना फॉर्म
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती मित्रांनो आता जमीन घेण्याकरिता शासनाकडून शंभर टक्के अनुदान नागरिकांना मिळत आहे. मित्रांनो हे अनुदान एका योजनेच्या माध्यमातून मिळत आहे चला तर पुढे पाहूया तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता.
मित्रांनो देशामध्ये सध्याही मोठ्या प्रमाणावर असे नागरिक आहेत ज्यांच्याकडे शेती करण्यासाठी स्वतःची जमीन नाही , आणि यातूनच त्यांची वाढ ही होत नाही . सांगण्याचा अर्थ किती दुसऱ्याच्या कामाला जाऊ रोज मजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. तर मित्रांनो जर तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल तर तुम्ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ शकता. मित्रांनो आज आपण जी योजना पाहणार आहोत त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जमिन खरेदी करण्यासाठी 100% अनुदान मिळणार आहे.
या योजनेचे नाव दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना असे आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतजमीन घेण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.
ज्या नागरिकांकडे शेती नाही आणि जे दुसऱ्या कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह चालवितात अशा नागरिकांसाठी उत्पन्नाचे साधा निर्माण करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून जमीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जात आहे.
आधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के कर्ज दिले जात होते मात्र आता शासनाच्या नियमांमध्ये बदल झालेले आहेत , त्यानुसार आकाश शंभर टक्के अनुदान हे जमीन खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे चला तर पुढे पाहूया.
योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे ?
मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून जमिनी खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान नागरिकांना दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून 2 एकर बागायती किंवा 4 एकर कोरडवाहू अशी जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. योजनेच्या माध्यमातून बागायती शेती करण्यासाठी एकर प्रमाणे आठ लाख रुपये तर कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये एकर प्रमाणे अनुदान दिले जाते. तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद !