Covid 19 New Cases In India | भारतात कोविड 19 नवीन प्रकरणे |

Covid 19 New Cases In India | भारतात कोविड 19 नवीन प्रकरणे |

परदेशातून मुंबईमध्ये परतलेले तीन जण कोरोना बाधित आढळले आहे.  व या तिघांमध्येही कोरोनाचा BF.7 हा  वेरीअंट  आढळला आहे. चीन मधल्या कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत ठरलेला हा वेरेंट यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळून आला आहे. यातील बाधित प्रवाशांपैकी दोघे चीन मधून मुंबईत परतले होते तर एक व्यक्ती कॅनडामधून आला होता . आता सॅम्पल जिनो सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आले आहेत.  तिघांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडलेली नाही.  या तिघांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून या तिघांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याचं एक वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे.  आतापर्यंत मुंबई विमानतळावर RTPCR चाचणी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 23 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून यामध्ये पाच मुंबईचे आहेत तर चार गुजरात मधले व तीन पुण्यामध्ये व तसेच दोन केरळमध्ये तर उरलेले प्रत्येकी एक रुग्ण नवी मुंबई अमरावती सांगली, गोवा तामिळनाडू उत्तर प्रदेश आसाम ओडिसा आणि तेलंगाना मधले आहेत आरोग्य विभागाने दिलेला माहितीनुसार चीन मधला कोरोनाचा वार्ता प्रदुर्भाव पाहता विमानतळावर आर टी पी सी आर चाचणी मध्ये पॉझिटिव्ह आलेले सगळे नमुने जीनाम सिक्वेन्सीसाठी पाठवण्याच्या आदेश केंद्राने प्रत्येक राज्याला दिले आहेत व सर्वांना सावधानी पाळण्याची गरज आहे.

RTPCR चाचणी म्हणजे काय ?  :
आरटी-पीसीआर चाचणी ही एक प्रयोगशाळा चाचणी आहे जी व्हायरस शोधण्यासाठी आरएनएचे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन डीएनएमध्ये एकत्र करते. RT-PCR चाचणी ही COVID-19 साठी सर्वात पसंतीची चाचणी आहे; तथापि, ही चाचणी वेळखाऊ आणि खर्चिक आहे कारण त्यात एक विस्तृत किट आहे. आरटी-पीसीआर चाचणी व्हायरस शोधण्यासाठी नाक किंवा घशातील स्वॅब वापरते. 

कोविड -19 ची लक्षणे : कोरोनाव्हायरस रोग 2019 विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ताप, खोकला,थकवा आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असे अशी लक्षणे दिसू लागतात. श्वास घेण्यात अडचण,सतत छातीत दुखणे,किंवा छातीवर दबाव आल्यासारखे वाटणे, जागे होण्यास अडचण येणे, गोंधळून जाणे आणि चेहरा किंवा ओठ निळे होणे यासारखे लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय उपचाराचा सल्ला दिला जातो. व तसेच शिंका येणे, नाक वाहने किंवा घसा खवखवणे अथवा मळमळ उलट्या किंवा अतिसार ही लक्षणे दिसून येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे फिजिकल डिस्टन्स पाळणे. प्रत्येक वेळी हाथा सॅनिटायझरने किंवा साधनाने स्वच्छ धुऊन घ्यावा हे अत्यंत आवश्यक आहे व तसेच शक्यतो बाहेरचे पदार्थ आणू नये जर तुम्ही भाजीपाला आणत असाल तर तो मी टाकून किमान दोन ते तीन वेळा धुवून वापरा.आपल्या घरात या विषयावर अजिबात चर्चा करू नका व असे म्हणा संकटे खूप येतात. आणि जातात आपले घर आणि परिसरात रोज साफसफाई करा तसेच गोळा केलेला कचरा हा जाळायचा व आपल्या नगरात नियमित फवारणी करण्याचा आग्रह धरा.

See also  Government Orders | सरकारी आदेश | Govt Results | सरकारी निकाल |

 

 

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment