Coronavirus Precautions Booster Dose | कोरोना संसर्ग बूस्टर डोस

Coronavirus Precautions Booster Dose सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याकारणाने आजपासून 10-1-2022 संपूर्ण देशामध्ये प्रिकॉशन डोस देण्यास सुरुवात झालेली आहे. हा डोस फ्रन्टलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी व 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आजारी लोकांना दिला जाईल.

ज्या व्यक्तीने कोरोनाचा दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आहे, या सर्व लोकांकरिता कोरोनाच्या प्रिकॉशन डोस साठी चा रजिस्ट्रेशन शनिवारी 8 जानेवारी पासून सुरू झालेले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, मणीपूर आणि गोवा येथे निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाइन कर्मचारी मानले जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मंसुख मंडविया यांनी ट्विट करून सांगितले आहे की एका कोटीहून अधिक कंटाळून कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोसा साठी एसएमएस पाठवून आठवण करून दिली केली आहे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले ल्या अंदाजानुसार 1.05 कोटी आरोग्य कर्मचारी, 2.75 कोटी 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक, 1.9 कोटी फ्रन्टलाइन कर्मचारी लोकांना या कार्यक्रमाअंतर्गत प्रतिबंधात्मक दोस्त दिले जातील.

प्रिकॉशन दोस बाबत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की नवीन नोंदी ची गरज नाही याकरता तुम्ही थेट अपॉइंटमेंट घेऊ शकता. इतकेच नाही तर थेट लसीकरण केंद्रामध्ये जाऊनही आपण लस घेऊ शकता. एनआयटीआय आयोगाचे सदस्य तसेच कोविड टास्क फोर्स चे प्रमुख डॉक्टर डॉक्टर व्ही. के. पोल यांनी सांगितले की प्रिकॉशन डोस किंवा बूस्टर डोस त्याच लसीचा असेल ज्या लसीचे पहिले दोन डोस आपण घेतले असतील.

केंद्र सरकारने आता असा निर्णय घेतला आहे की, ज्यांना यापूर्वी कोवीशील्ड लसीकरण करण्यात आलेले आहे, त्यांना कोवीशील्ड बूस्टर डोस दिला जाईल. ज्यांनी यापूर्वी कोव्हक्सीन लस घेतली आहे त्यांना कोव्हक्सिनचा बूस्टर डोस मिळेल.

 

See also  Corona Virus| कोविड-19|Coronavirus|Covid-19 in Maharashtra|कोविड-19 महाराष्ट्र|

Leave a Comment