चायप्रेमींना…… थंड झालेला चहा पुन्हा गरम करून पिण्याची चूक करू नका!Cold Tea Hot Tea
थंड झालेला चहा पुन्हा गरम करून का पिऊ नये? Cold Tea Hot Tea
चहा हे आपल्या भारतीयांसाठी अमृतासमानच आहे. परंतु तो जेवढा चांगला आहे तेवढाच घातकही ठरू शकतो. आपल्याला चहा पिण्याची खुप सवय असते ती म्हणजे घरात पाहुणे आले, कधी पाऊस पडला, थंडी, थकवा, डोकेदुखी किंवा आळस येत असेल या सर्वांसाठी आपल्याला एकच पर्याय सुचतो, तो म्हणजे चहा. जणू चहा म्हणजे चहा नाही, ब्रह्मास्त्र आहे. प्रत्येकाला चहा आवडतो. परंतु आपण सर्वजण चहाच्या संदर्भात दररोज चूक करतो. एकदा कपात गाळलेला चहा थंड झाला की पुन्हा गरम केला जातो. चहा वारंवार गरम करून पिण्याची सवय अनेकांना असते.
आपल्यापैकी बहुतांश लोकांना चहाची चाहत असते. घरात कोणी पाहुणे आले, पाऊस असेल, सर्दी, डोकेदुखी किंवा थकवा यापैकी काहीही कारण असेल तर त्यावर एकच उपाय तो म्हणजे चहा. अगदी बोटांवर मोजण्याइतकी लोकं असतील ज्यांना चहा आवडत नसेल. मात्र चहाच्या बाबतीत आपण एक नेहमी चूक ती म्हणजे चहा थंड झाला ती तो पुन्हा गरम करणं….
जर तुम्हीही थंड झालेला चहा पुन्हा गरम करून पीत असाल तर आताच थांबा. कारण असं करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं याची तुम्हाला कल्पना आहे का. जाणून घेऊया तयार झालेला चहा पुन्हा गरम करून का पिऊ नये.
पोषत तत्त्व आणि चव निघून जातं :
चहा तयार केल्यानंतर तो पुन्हा गरम करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चहाची चव आणि सुगंध पूर्णपणे नाहीसा होतो. एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही चहा पुन्हा गरम करता तेव्हा ते चहाच्या आत असलेले पोषक घटक पूर्णपणे नष्ट होतात.
या आजारांचा धोका असू शकतो :
जेव्हा तुम्ही चहा गरम केल्यानंतर पिता तेव्हा असं केल्याने चहाचे सर्व गुणधर्म आणि चांगले संयुगं बाहेर निघून जातात. त्यानंतर त्याला चवंही राहत नाही. उलट ते आरोग्यासाठीही नुकसानदायक ठरतं. आम्ही तुम्हाला सांगू की, गरम चहा प्यायल्याने अतिसार, उलट्या आणि पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. त्यामुळे गरम चहा पिऊ नये.
माइक्रोबियल ग्रोथ :
जर तुम्ही चहा दीर्घकाळ म्हणजे सुमारे 4 तास तसाच ठेवलात तर या काळात अनेक बॅक्टेरिया चहामध्ये प्रवेश करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही चहा गरम केलात, तर त्याची केवळ चवंच बदलत नाही तर चहाच्या आत असलेले सर्व फायदेशीर पोषक बाहेर जातात.
दुसरीकडे बहुतेक लोकं दुधाच्या चहाचं सेवन करतात. ज्यामध्ये सूक्ष्मजीव लवकर विकसित होण्याचा धोका असतो. त्यामुळे जर तुम्ही हर्बल चहा गरम करून पित असाल तर त्याच्या आत असलेले सर्व गुणधर्म देखील निघून जातात. म्हणून, चहा जास्त काळ ठेवू नका आणि गरम करून पिऊ नका.
टॅनिन निघून जातं :
जर तुम्ही चहा बराच वेळ ठेवल्यानंतर तो गरम केलात तर त्यातील टॅनिन निघून जातंय. यामुळे चहाची चव पूर्णपणे कडू होते. अशा परिस्थितीत हा चहा तुमच्या तोंडाची चव देखील खराब करतो.
चहाच्या सेवनाबाबत या ३ गोष्टी लक्षात ठेवा.
1) जर तुम्हाला चहा बनवून फक्त 15 मिनिटे झाली असतील तर तुम्ही पुन्हा गरम करून पिऊ शकता.
2) जर चहा ठेवून 4 तासांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर ते पुन्हा गरम करण्याची चूक अजिबात करू नका.
3) चहा बनवताना, त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या. आवश्यक तेवढाच चहा बनवा.