Children’s Day Special LIC New Children Money Back Plan न्यू चिलड्रन्स मनी बॅक प्लॅन

Children’s Day Special LIC New Children Money Back Plan – आज Childrens Day बाल दिवस आहे. अशातच तुमच्या मुलांना काहीतरी वेगळं गिफ्ट देण्याच्या तयारीत असाल तर, त्यांना भविष्यात फायदा होईल अशा एलआयसी प्लॅनची निवड़ करा. तुमच्या कमाईतील काही हिस्सा बचत करून तुम्ही मुलांचे भविष्य चांगले बनवू शकता.

एलआयसी LIC तुमच्यासाठी भन्नाट पॉलिसी Policy  घेऊन आली आहे. ती पॉलिसी म्हणजेच New Children Money Back Plan होय. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकाल. आज बाल दिवशी हे गिफ्ट नक्कीच मुलांसाठी फायद्याचे ठरू शकते.

न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन काय आहे?

जर तुम्ही आपल्या मुलांना बाल दिवसाचे गिफ्ट देऊ इच्छित असाल तर, किंवा त्यांचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर, एलआयसीच्या New Children Money Back Plan मध्ये गुंतवणूक सुरू करायला हवी. ही पॉलिसी मुलांना येणाऱ्या काळात लखपती बनवू शकते. यासाठी तुम्हाला दररोज 150 रुपयांची बचत करणे आवश्यक असेल.

काय आहे पॉलिसी?

जीवन विमा निगमच्या न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन पॉलिसीमध्ये 25 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यात येते. यासोबतच तुम्हाला मॅच्युरिटिची रक्कम टप्प्यांमध्ये मिळते. जेव्हा तुमचा मुलगा 18 वर्षांचा होईल. तेव्हा पहिल्यांदा या रक्कमेचे पेमेंट होईल.

मिळेल रक्कमेसोबत बोनस देखील

न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनच्या अंतर्गत जीवन विमाधारकाला मनी बॅक टॅक्सच्या अंतर्गत विम्याच्या रक्कमेचे 20-20 टक्के मिळत असते. जेव्हा मुलगा 25 वर्षाचा होईल. तेव्हा पूर्ण रक्कम परत केली जाते सोबहतच 40 टक्क्यांचा बोनस देखील देण्यात येतो.

प्रत्येक दिवशी 150 रुपयांची बचत

मुलांचे भविष्य सुधारायचे असल्यास विम्याच्या रक्कमेचा हफ्ता 55 हजार रुपये इतका येतो. जर 365 दिवसांच्या हिशोबाने पाहिले तर, 25 वर्षात एकूण 14 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच मॅच्युरिटीनंतर 19 लाख रुपये मिळतात.

See also  Business Ideas for Housewife|महिला उद्योजकांसाठी व्यवसाय कल्पना|small business ideas for housewives in india

Leave a Comment