Bharat Jodo Yatra Starts From Today | भारत जोडो यात्रा आज पासून सुरू | आपण सर्वांनाच माहिती आहे की, राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती. भारत जोडो यात्रा ही काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही यात्रा जवळपास 9 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पासून पुन्हा सुरू होणार आहे.
व तसेच उत्तर प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या माहितीनुसार ही यात्रा आज दिनांक 3 जानेवारीला उत्तर प्रदेश मध्ये प्रवेश करणार आहे. व नंतर 120 किलोमीटरचा प्रवास करून 5 जानेवारी रोजी हरियाणा येथे पोहोचणार भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्ली येथे पोहोचले होते. त्यानंतर यात्रा शीताकालीन विश्रांतीसाठी थांबली आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी ज्या यात्रेची सुरुवात केली होती. जी सर्वांना माहितीच आहे. भारत चळवळ यात्रा ही असून ते कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरला सुरू झाली.