Bharat Jodo Yatra Maharashtra Schedule | भारत जोडो यात्रा महाराष्ट्र वेळापत्रक | या यात्रेने आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या काही भागातून मार्गक्रमण केले आहे. ही यात्रा दिल्लीत असून आज उत्तर प्रदेश येथे पोहोचणार आहे. ही माहिती उत्तर प्रदेश काँग्रेस नेते यांनी दिली व या यात्रेचे समापन जम्मू-काश्मीरमध्ये या यात्रेत आतापर्यंत सामाजिक, राजकीय आणि चित्रपट या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग आहे. माहितीनुसार आतापर्यंत 110 दिवसात 3000 किमी पेक्षा अधिक अंतर कापले. काँग्रेसचा असा दावा आहे की, भारत जोडो यात्रा ही इतिहासातील आजपर्यंत सर्वात प्रदीर्घ पदयात्रा आहे. काँग्रेसने दिलेला माहितीवरून भारत जोडो यात्रा ही यात्रा संपल्यानंतर काँग्रेस परत हात से हात जोडो हे अभियान सुरू करणार आहे. व या अभियानाचे नेतृत्व प्रियांका गांधी यांच्यावर सोपवले आहे.