Accident on Babhulgaon | बाभूळगाव येथे अपघात |

Accident on Babhulgaon | बाभूळगाव येथे अपघात | वाशिम – बाळापुर रोडवरील बाभुळगाव येथे रात्रीच्या सुमारास एक ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आपल्यासमोर आली आहे.पातुर तालुका येथील बाबळगाव येथे दिनांक 20 जानेवारीच्या मध्यरात्री सुमारे तीन वाजताच्या सुमारास बाळापुर कडून येणारा ट्रक क्रमांक (MP13 GB 2214) या ट्रकमध्ये असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या मधात ट्रक पलटी झाला सुदैवाने या अपघातात कुठल्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही परंतु दिल्ली हैदराबाद जोडणाऱ्या या मुख्य महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने मध्यरात्रीपासून वाहतुकीचा गोंधळ होत आहे व सर्व इकडे ट्राफिक जाम आहे व तसेच वाहनाच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या.
सदर अपघात आज सकाळच्या सुमारास स्थानिक गावकऱ्यांच्या निदर्शनास आला असता. त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती पात्र पोलिसांना दिली होती परंतु दुपारच्या दोन वाजेपर्यंत एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थानी रस्त्याच्या साईटला असलेले खड्डे बुजवून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला. आणि सर्व वाहतूक ही स्वतःहून सुरळीत करीत आहेत. नेहमी अवजड वाहनांची वाहतूक असणाऱ्या मुख्य महामार्गावर मध्यरात्रीपासून पलटी झालेल ट्रक मुळे बाकी वाहनांना व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. या संबंधित प्रशासनाने सदर प्रकरणे दुपारपर्यंत कुठल्याच उपायोजनांना केल्याने वाहतूक पोलिसांचे काम बाभुळगावचे नागरिकांनी हाती घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम करावे लागले त्यामुळे बाबळगाव स्थानिकाकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

See also  South Central Railway Recruitment 2023. | दक्षिण मध्य रेल्वे भरती 2023. |

Leave a Comment