Aasha Swayam Sevika Mandhan Wadh | आशा सेविकांसाठी खुशखबर

Aasha Swayam Sevika Mandhan Wadh आशा सेविकांसाठी खुशखबर वाढीव मानधन खात्यात येणार……. जाणून घ्या काय आहे माहिती.

राज्यातील हजारो आशा सेविकांना गटप्रवर्तक यांना दिलासा देणारी खुशखबर देणार आहे. महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय हा 7 मार्च 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. याबद्दलची माहिती आजच्या पोस्टच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील लसीकरणासह (Vaccination) अन्य आरोग्य सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांनी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होऊन त्यांची मदत केलेली आहे. राज्य सरकारनं आशा सेविकांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केले होते. कोरोना कालावधीमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून सामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या अशा सेविका आणि आशा भगिनींना या ठिकाणी त्यांच रास्त वेतन मिळणे, मानधन मिळणे हे गरजेचं होतं. याच्यासाठी आपण पाहिलं तर 2021 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला होता आणि राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या आशा सेविकांना बहिणी म्हणून एक भावनात्मक पत्र लिहून आपली पगार वाढ करण्यात आले अशा प्रकारच्या जाहीर केले होते.

याच्या नंतर एक शासन निर्णय काढण्यात आला होता आणि आशा सेविकांना प्रतिमहा 2000/- रुपये तर अशा गटप्रवर्तकाना प्रतिमा 3000/- रुपये अशा प्रकारची पगार वाढ जाहीर करण्यात आले होते. ही पगारवाढ जाहीर झाल्यानंतर सुद्धा आठ-नऊ महिन्याचा कालावधी लोटला तरी सुद्धा या सेविकांना
मिळालेली नव्हती, कारण होतं ते म्हणजे निधीची तरतूद आणि याच्यासाठी 2021- 22 च्या अर्थसंकल्पीय तरतुदी मधून या निधीची तरतूद करून हा निधी वितरीत करून अशा सेविकांसाठी झालेली पगारवाढ प्रतिमाहा 2000/- रुपये आणि गटप्रवर्तक यासाठी झालेली प्रकार प्रतिमाह 3000/- रुपये ही जुलै 2021 पासून मार्च 2022 पर्यंत त्याचे आता नव्याने वाढीव पगार हे देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आले.

See also  एका तासात काढू शकता पीएफ खात्यातून 1 लाख रुपये EPF Loan Withdrawal

तर एकंदरीत काय शासन निर्णय कशाप्रकारे पगार वाढ या ठिकाणी देण्यात येणार आहे. ते सुद्धा शासन निर्णयाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया. यांच्या संदर्भातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 7 मार्च 2022 रोजी हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता.

या शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता. केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना, निकष आहे. त्याप्रमाणे आशा सेविकांनी सेवा केल्यास त्यांच्या सेवेनुसार त्यांना त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना एक वाढीव आशा सेविकांना 2000/- रुपये आणि आशा प्रवर्तकांना 3000/- रुपये मानधन देण्यासाठी 17 जुलै 2020 रोजी शासन निर्णय घेण्यात आला होता. आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांच्या वाढीव मानधन वितरित करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण वर्गवारी मधून मागणी केलेल्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेली निधीमधून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक जुलै 2021 ते मार्च 2022 या कालावधीचे तसेच 9 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या जुलै 2021ते मार्च 2022 या कालावधीमध्ये मानधनाचे 180.67 कोटी रक्कम या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

तर मित्रांनो हा निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. यामाध्यमातून आशा सेविकांसाठी किंवा गटप्रवर्तक सेविकांसाठी वाढीव मानधन मिळाल्यास मदत होईल. (Aasha Swayam Sevika Mandhan) Wadh
आणि त्या व्यतिरिक्त maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणखीन माहिती पाहू शकता.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment

x
error: Content is protected !!