शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची पदे भरणार | Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 – महाराष्ट्र राज्यामध्ये आता तब्बल 20 हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकारने युवा दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील 2 वर्षांपासून कोविड व अन्य कारणांमुळे पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे आता राज्यांमध्ये लवकरच पोलीस भरती करणार आहोत असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले की, “एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी घेतलेला आहे आणि दोन वर्षाची पोलीस भरती आता आम्ही हाती घेतलेली आहे. साधारणतः 20000 पोलिसांची पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे”

तसेच “यासंदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू जवळपास साडे सात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली असून आणखी 12000 पदांची एक जाहिरात लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत त्यामुळे पोलीस दलाला निश्चितच फायदा होईल” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

राज्यांमधील शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरात लवकर सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणखी 7000 पोलिसांची भरती ही केली जाणार आहे त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचे करण्याची सूचना देण्यात आलेली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Police Bharti 2022

सध्या महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये 7231 पदांची भरती होणार असून काही जिल्ह्यांच्या जागा सुद्धा घोषित झालेले आहेत. अहमदनगर 139 नांदेड 128 पालघर 117 बुलढाणा 115 नागपूर ग्रामीण 108 नागपूर शहर 153 जळगाव 154 सोलापूर ग्रामीण 145 मीरा-भाईंदर 505 नवी मुंबई 358 मुंबई लोहमार्ग 505 मुंबई 1431 गडचिरोली 241 पुणे ग्रामीण 158 ठाणे शहर 236 पुणे शहर 182 एकूण 4675

See also  Compensation For Loss Of Wild Animals | वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाई |

पोलीस भरतीच्या तारखा तसेच परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अपडेट करू.

पुरुष मैदानी चाचणी गुण

1600 मीटर धावणे 20 गुण

100 मीटर धावणे 15 गुण

गोळा फेक 15 गुण

एकूण 50 गुण

महिला मैदानी चाचणी गुण

800 मीटर धावणे 20 गुण

100 मीटर धावणे 15 गुण

गोळा फेक 15 गुण

एकूण 50 गुण

अन्य भरती जाहिरात बघण्याकरता येथे क्लिक करा

Leave a Comment