बस योजना महाराष्ट्र शासन
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेबसाईट वरती विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी. विद्यार्थी मित्रांसाठी आता शासनाकडून एक घोषणा करण्यात आलेली आहे चला तर पुढे पाहूया काय आहे घोषणा. वेळोवेळी विद्यार्थी मित्रांना शाळेमध्ये जाण्यासाठी बसने जावे लागते आणि यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. तर मित्रांनो आता मोफत बस सुविधा शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी चालू केलेले आहेत चला तर पुढे पाहूया ही योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या कानांवर आले आहे की वृद्ध नागरिकांसाठी आता मोफत बस झालेली आहे आणि वृद्ध व्यक्ती महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकतात तर मित्रांनो सध्याचा आषाढी एकादशी संपल्याने सर्व वृद्ध नागरिकांनी बसने प्रवास केला आणि या योजनेचा लाभ घेतला.
तसेच मागील काही दिवसाआधी घोषणा झाली होती. की महिलांना एसटी बसचा प्रवास 50% मोफत दिला जाणार आहे आणि ही सवलत शासनाकडून मिळालेली होती तर मित्रांनो विविध महिलांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे .
विविध विद्यार्थी शिक्षणासाठी बसले जातात त्यामध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर पैसा हा व्यर्थ होतो . तर मित्रांनो आता शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून बारावीपर्यंतच्या मुला मुलींना मोफत प्रवास सवलत दिल्या जाणार असा ठराव आला आहे.
आतापर्यंत फक्त दहावीपर्यंतच्या मुलींना ही योजना होती मात्र आता बारावीपर्यंत ही विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. धन्यवाद !