Diwali Crackers फटाक्यांची सुरुवात कशी झाली?

Diwali Crackers – मित्रांनो सध्या दिवाळी सणाचा प्रसंग आहे.  आकाश कंदील आणि फराळ बरोबरच फटाक्यांची सुद्धा दुकाने सजलेली आहेत.  विविध आकाराचे फटाके आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असलेले दिसतात. तसे पाहिले तर वर्षभर फटाके फोडले जातात परंतु दिवाळीत त्या मानाने जास्तच फोडल्या जातात आणि दिवाळीत फटाक्यांना मागणी सुद्धा खूप असते दरवर्षी काही जण फटाके बंदीची मागणी करतात परंतु फटाके हा विषय उत्सुकतेचा आहे.

फटाके आले कुठून? Diwali Crackers

मित्रांनो फटाके सर्वांनाच परिचित आहेत परंतु ते आले कुठून त्याचा वापर कधी सुरू झाला हे पाहणे खूप गरजेचे आहे. सुमारे 2200 वर्षांपूर्वी चीनच्या लुईयांग प्रांतांमध्ये फटाके फोडण्याचा प्रथेला सुरुवात झाली.

त्यावेळी हे फटाके म्हणजे बांबूच्या छड्या असत, ज्या आगीमध्ये टाकल्यानंतर त्यातील गाठींचा आवाज येत असे.

चीनमध्ये ज्या वेळेस सण-समारंभ असेल त्या वेळी फटाके फोडण्याचा प्रथेला सुरुवात झाली आणि त्यास प्रतिष्ठा सुद्धा प्राप्त झाली.

चीन मधून भारतामध्ये फटाके आले भारतात फटाक्यांचा पहिला कारखाना 1923 मध्ये नाडर बंधूंनी कोलकात्यामध्ये आगपेटीच्या फॅक्टरीत सुरू केला.

त्यानंतर 1940 मध्ये शिवकाशी येथे सुद्धा फटाक्यांचा कारखाना स्थापन करण्यात आला भारत घरामध्ये तामिळनाडूतील शिवकाशी येथील फटाके प्रसिद्ध असलेले दिसतात.

याचा शोध युरोपीय इतिहासकार असे म्हणतात की सर्वप्रथम रॉजर बेकन या रसायन तज्ञाने लावला.

13 व्या आणि 15 व्या शतकामध्ये फटाक्यांचा चीनमधून जगभर प्रसार झाला.

युरोपमध्ये फटाक्यांना भरपूर प्रमाणात लोकाश्रय मिळाला युरोप नंतर अमेरिकेत फटाके पोहोचले आणि तिथे पहिल्या स्वातंत्र्य दिनी फटाक्यांची आतिषबाजी आली.

भारतामध्ये मुघलांच्या काळात पंधराशे 26 मध्ये तोफांचा वापर झाला बाबा नये दिल्लीच्या सुलताना वर हल्ला चढवला तेव्हा तोफांचा वापर केला त्या वेळी धाकाने अनेक सैनिक पळून गेले.

त्या अगोदर पाहिले तर 1518 मध्ये गुजरात मधील एका विवाह सोहळ्यात फटाक्यांचा वापर केल्याचा उल्लेख इतिहासात मध्ये मिळतो.

See also  Bhimashankar भीमाशंकर ज्योतिर्लिंग

वस्तुतः पाहिले तर  1443 मध्ये विजयनगरचे राजे देवराय द्वितीय यांच्या काळामध्ये महा नवमीच्या सणाला आतिषबाजी झाल्याचे इतिहासात नमूद आहे.

तर अशाप्रकारे मित्रांनो फटाके आले कसे याची आपण धमाकेदार कहानी वाचली. असेच रोचक वाचण्याकरिता आमच्या अद्भुत मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment