शेत पेरणीसाठी बिनव्याजी कर्ज कोणत्या बँक देतात.
नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अति महत्त्वाची बातमी आहे . मित्रांनो शेतकरी मित्राला शेती करतावेळी पैशांची गरज हे असतेच , यासाठी ज्यांच्याजवळ असते ते स्वतः लावतात आणि ज्यांच्याजवळ नसते ते कोठूनही कर्ज घेतात आणि नंतर ती रक्कम आणि व्याज परत करतात तर अशावेळी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो .
आणि पैसा वेळेवर मिळाल्याने शेतकऱ्यांची सर्व कामे ही पूर्ण होतात मात्र त्यांना व्याज खूप मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते. तर आता शासनाने यासाठी एक उपाय सुचविला आहे आता शासनाकडून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आता शेतकरी मित्रांना कर्ज मिळणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर जमा झाले पाहिजे यासाठीच ही योजना चालू केली गेली आहे . याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे पाहूया.
जर तुम्हाला बिनव्याजी कर्ज पाहिजे असेल तरीही योजना तुमच्या नक्कीच कमी येईल.
मित्रांनो यासाठी तुम्ही 0 % व्याजदर असणाऱ्या बँकांकडून सुद्धा कर्ज घेऊ शकता.
मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना याच्या माध्यमातून आता कृषी पतसंस्थांकडून शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याची सवलत चालू झालेली आहे याच्याच माध्यमातून राष्ट्रीयकृत बँका , खाजगी बँका कडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लागू राहणार आहे , ग्रामीण बँकांच्या माध्यमातूनही सुविधा उपलब्ध राहणार आहे. योजनेच्या माध्यमातून माध्यमातून विविध बँकांचे नियम हे थोडे वेगळे असू शकतात . या योजनेच्या माध्यमातून कृषी पतसंस्था मार्फत आणि ज्या बँक आहेत त्यांच्यामार्फत मिळणारे जे कर्ज आहे त्यावर व्याजदर सवलत देण्यात येत आहे.
मित्रांनो याच्या माध्यमातून पुढील व्याजदर असणार आहे .
जर आपण 1 लाख पर्यंत पीक कर्ज घेतले तर वार्षिक 3 % हा व्याजदर असणार आहे .
मित्रांनो जर आपण 3 लाखापर्यंत कर्ज घेतले तर आपल्याला 1 टक्के व्याज दराने ही सवलत लागू करण्यात येणार आहे.
आणि ज्या शेतकरी मित्रांनी तीन लाख पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले आहे त्यांना 3 % व्याजदर सवलत करण्यात येणार आहे . अशा पद्धतीने कमीत कमी व्याजदर या बँकांकडून पीक कर्जासाठी घेण्यात येत आहे.