Online Application for Passport मोबाईल वरून ऑनलाइन एप्लीकेशन करा पासपोर्टकरीता

Online Application for Passport तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल आणि कोरोना काळामध्ये तुम्हाला घराबाहेर पडता आले नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही कारण आता तुम्हाला पासपोर्ट बनवण्यासाठी यापुढे पासपोर्ट ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही आहे आता तुम्ही घरी बसून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता.

पासपोर्ट अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवा app आणि वेबसाईटचा (https://passportindia.gov.in) वापर तुम्ही करू शकता. नोंदणीनंतर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी एक तारीख किंवा दिनांक दिल्या जाईल. त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रावर किंवा प्रादेशिक पासपोर्ट ऑफिस ला जाऊन भेट द्यावी लागेल.

Online Application for Passport

ऑनलाइन पासपोर्ट नोंदणी कशी करावी? How to apply online Passport

हे आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, तुम्ही जर पासपोर्टसाठी अर्ज करत असाल, तर त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जवळ ओरिजनल कागदपत्र ठेवावे लागतील. जशी की तुमचे मतदान ओळखपत्र आधार कार्ड जन्माचे प्रमाणपत्र इत्यादी असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जो दिनांक दिल्या जाईल. त्या दिनांक आला तुम्हाला पासपोर्ट सेवा केन्द्र किंवा प्रादेशिक कार्यालयात जाऊन तुमची मूळ कागदपत्र दाखवावी लागतील.

अर्ज कसा करायचा?

सर्वात प्रथम आपण सेवा पोर्टल Seva Portal (https://passportindia.gov.in) किंवा ॲप वर जाणे गरजेचे आहे आणि Register Now वर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला तुमच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि सेवा केंद्राचा तपशील भरावा लागेल.

Online Application for Passport

पुढची स्टेप म्हणजे तुम्हाला हा तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी भरावे लागेल. त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू, तेव्हा आपल्या समोर दोन पर्याय असतील एक म्हणजे फ्रेश पासपोर्ट आणि दुसरे म्हणजे री इशू पासपोर्ट.

या अगोदर जर तुम्ही पासपोर्ट बनवला नसेल तर तुम्हाला फ्रेश पासपोर्टचा पर्याय निवडावा लागेल. त्याच बरोबर तुम्हाला पासपोर्टचे नूतनीकरण किंवा रिलेशन करायचे असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

See also  Zomato Food Delivery | झोमॅटो फूड डिलिव्हरी |

आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

नंतर तू मला पेमेंट करायचे आहे आणि तुमची अपॉइंटमेंट शेडूल करायची आहे म्हणजेच तुम्हाला ज्या दिवशी पासपोर्ट ऑफिस मध्ये कागदपत्र व्हेरिफाय करायचे असतील तो दिवस तुम्हाला निवडावा लागेल आणि त्यानंतर अर्ज पावतीची एक प्रिंट घ्यावी लागेल.

Online Application for Passport नंतर तुम्हाला मिळालेल्या तारखेस आपल्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देऊन किंवा प्रादेशिक कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे दाखवावी लागतील. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व्हेरिफिकेशन होईल जे आपल्या स्थानिक पोलिस स्टेशन वरून केले जाईल त्यानंतर तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी येईल.

 

Leave a Comment