Hindu Philosophy Benefits of Tilak Kumkum जगातील प्रमुख धर्मांपैकी, हिंदू धर्म एक प्रमुख धर्म आहे. जगामध्ये जवळपास 1.40 नागरिक हिंदू धर्माचे आहेत. भारतामध्ये हिंदू धर्माचा जन्म झाला आणि जगातील सर्वात प्राचीन धर्म सुद्धा हिंदू धर्माला मानले जाते.
Hindu Philosophy Benefits of Tilak Kumkum | कपाळावर टिळा लावण्याचे फायदे कोणते?
मागील काही वर्षांमध्ये हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानाचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडलेला आहे. अमेरिका, श्रीलंका, कॅनडा, इंडोनेशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये हिंदू धर्म आणि त्याचे तत्वज्ञान याचा प्रभाव पडलेला आहे.
हिंदू धर्मामध्ये जगत असताना हिंदू धर्मात अशा लहान मोठ्या गोष्टी सांगितले आहेत की ,ज्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यामध्ये फारच उपयुक्त ठरत आहेत. आपण आपले आयुष्य कसे जगले पाहिजे? याबाबत अनेक प्रकारे मार्गदर्शनपर गोष्टी हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये सांगितलेले आहेत.
त्यापैकी एक गोष्ट म्हणजे टिळा लावणे, टिळा हिंदू धर्मामध्ये लावण्याचे विशेष महत्त्व आहे. कपाळावर टिळा लावणे ही अतिशय साधी गोष्ट आहे. परंतु लग्न असेल किंवा पूजा असेल किंवा धार्मिक विधी असतील, तर या ठिकाणी आपण हिंदू धर्मातील लोक आवर्जून कपाळावर टिळा लावतात असे दिसते.
कथा आणि ग्रंथांमध्ये टिळा लावण्याचे अनेक अशी फायदे सांगितले आहेत. इतकच काय, तर याबाबत शास्त्रीय संशोधन देखील झालेला आहे. टिळा लावण्याचे अनेक वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत. अभ्यासामध्ये असे दिसले आहे की, टिळा लावण्याने मनुष्यास अनेक असे फायदे मिळतात.
हिंदू धर्मात अनेक रंगाचे टिळे लावले जातात. कोणता टिळा कसा लाभदायी आहे आणि तो कोणत्या रंगाचा असावा याची माहिती हिंदू धर्मातल्या तत्वज्ञानानुसार कळते. तसेच कपाळावर टिळा लावणे हे शुभ सुद्धा मानला जाते. अस म्हणतात की, त्यामुळे सकारात्मकता आपल्या अंगी येते आणि देवाच्या कृपेने कुंडलीतले ग्रह शांत होतात. टिळा लावण्याने ग्रहमान सुधारते आणि अडकलेली कामसुद्धा होतात. दिवसानुसार काही विशिष्ट रंगाचा टिळा आपण जर लावला तर त्याचा फायदा हा वेगळा होतो असे मानले जाते. सोमवारी पांढरा चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत राहतं. बुधवारी चमेलीच्या तेलात मिसळून कपाळी लावून शुभ मानला जातो कारण त्यामुळे आपल्या शरीरास सकारात्मक ऊर्जा मिळते.
बुधवारला कोरडं कुंकू लावण्याचे चांगले मानले जाते गुरुवारी पिवळा चंदन किंवा हळदीचा टिळा लावल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. शुक्रवारी रक्तचंदन किंवा कुंकवाचा टिळा लावल्याने समृद्धी मिळते. शनिवारी भस्म आणि लाल चंदनाचा टिळा लावण्याचा सल्ला जाणकार देतात, त्यामुळे आयुष्यभराच्या अडचणी दूर होतात. रविवारी रक्तचंदन लावल्यास व्यक्तीला मानसन्मान आणि वैभव मिळते. या सर्व धार्मिक समजुती आहेत. मात्र याबाबत शास्त्रीय अभ्यास देखील इथे पाहणे आवश्यक आहे.
शास्त्रीय अभ्यासाअंती टिळा लावल्याने कपाळ शांत राहते, व्यक्तीला मानसिक शांती सुद्धा मिळते. यामुळे आपल्या कामावर आपला लक्ष केंद्रीत राहते, यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि म्हणून व्यक्ती आपले निर्णय ठामपणे घेऊ शकतात. असा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे. टिळा लावला की मेंदूतल्या सेरोटनिन आणि बीटा इंडॉर्फिनचा स्त्राव संतुलित राहतो.
यामुळे आपल्याला दुःखाच्या भावना दूर करण्यासाठी मदत होते आणि आपण व्यक्ती म्हणून आनंदी राहतो. अनेकांना हळदीचा टिळा लावणे आवडते. ही बाब शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे असे म्हटले जाते. हळदीमध्ये त्वचा विकार दूर करणारे बॅक्टेरिया गुण असतात, शिवाय हळदीचा टिळा डोकेदुखीच्या समस्येला तोंड देण्यासाठी ही देखील उपयुक्त ठरते हळदी प्रमाणे चंदनाचा टिळा लावण्याची ही काही विशेष असे फायदे आहेत. चंदनाचा टिळा मेंदूला शांत ठेवतो आणि यामुळे आपली डोकेदुखी कमी होण्याची शक्यता आहे मन एकाग्र राहतं अशाप्रकारे टिळा लावणे हे धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टीने चांगला मानले जाते.
आमच्या मराठी आरोग्य आणि योगा या ब्लॉगला अवश्य भेट द्या