Highway Stone हायवेवर वेगवेगळ्या रंगाचे माईल स्टोन असतात माहिती आहे? लगेच जाणून घ्या.
Highway Stone हायवेवर वेगवेगळ्या रंगांचे दगड का आसतात?
जेव्हा तुम्ही कुठे फिरायला जाता तेव्हा तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेले माईल स्टोन पाहिलेच असणारच त्यात काही शंका नाही परंतु हे माइल स्टोन काहीतरी दर्शवत असतात, ते आपल्याला नेमकं माहिती नसतं. त्यावर एखाद्या गावाचं नाव आणि ते किती किलोमीटर आहे, हे लिहलेले असते. या माईल स्टोनच्या मदतीने तुम्हाला रस्ता समजायला मदत मिळते. वेगवेगळ्या रंगाचे असे दगड तुम्हाला हायवेवर ठिकठिकाणी दिसून येतात. पण हे दगड रंगीबेरंगी का असतात याचा विचार कधी तुम्ही केलाय का? त्याचबरोबर या दगडांना वेगवेगळा रंग का दिला जातो? याचा विचारही कधी तुम्ही केला नसेल. परंतु या रंगांच्या मागे एक गोष्ट लपलेली आहे.
पिवळ्या रंगाचा माईल स्टोन :
भारतातील राष्ट्रीय महामार्ग एका राज्यातून अनेक राज्यांत विस्तारले गेले आहेत. हे महामार्ग शहरांना इतर राज्यात जोडतात. 2015-2016 सालच्या नोंदीनुसार भारतातील राष्ट्रीय महामार्ग 1.01 लाख कि.मी.पर्यंत पसरलेले आहेत. जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाचा माईल स्टोन दिसला तर याचा अर्थ असा की, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात.
उत्तर-दक्षिण कॉरिडोर (जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत), पूर्व-पश्चिम कॉरिडोर (पोरबंदर ते आसाममधील सिलचरपर्यंत) आणि भारताच्या मेट्रो शहरांना जोडणारा सुवर्ण चतुर्भुज हा राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या महामार्गांना मेनटेन करतात.
हिरव्या रंगाचा माईल स्टोन :
जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला हिरव्या रंगाचे माईल स्टोन दिसला. तर याचा अर्थ असा की, तुम्ही राज्य महामार्गावर प्रवास करत आहात. अशाप्रकारचे महामार्ग तयार करणे आणि याची देखभाल करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. भारत सरकारच्या नोंदीनुसार राज्य सरकारचे महामार्ग त्या-त्या राज्यातील शहरांशी जोडले जातात. 2015-2016 च्या नोंदीनुसार, देशातील राज्य महामार्गांची एकूण लांबी सध्या 1.76 लाख किमी आहे.
काळे, निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे माईल स्टोन :
जर तुम्हाला निळा, काळा किंवा पांढऱ्या रंगाचा एक माईल स्टोन दिसला तर याचा अर्थ असा की, तुम्ही शहरात प्रवास करत आहात. नाहीतर कुठल्यातरी जिह्यातील रस्त्यावरुन जात आहात. जिल्हा रस्ता, हा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जोडल्या जातो. सद्यस्थितीत जिल्हा रस्ता जवळपास 5.26 लाख किलोमीटरपर्यंत आहे.
नारंगी रंगाचा माईल स्टोन :
जर तुम्हाला नारंगी रंगाचा माईल स्टोन दिसला, तर याचा अर्थ की तुम्ही एका ग्रामीण भागातील रस्त्यावरून प्रवास करत आहात. सध्या ग्रामीण रस्त्यांची एकूण लांबी 3.93 लाख किमी आहे. नारंगी पट्टा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे प्रतिनिधित्व करते.
झिरो माईलसेंटर :
ब्रिटिश काळात झिरो माईलसेंटरचा वापर केला जात होता. सर्व शहरांमधील अंतर मोजण्यासाठी तो एक केंद्र बिंदू असायचा. ब्रिटिश काळात नागपूर हे शून्य मैलांचे केंद्र होते आणि ते वसाहतीच्या भारताचे भौगोलिक केंद्र बनले. या केंद्रावर चार घोडे आणि एक आधारस्तंभ असायचा. त्यावर रस्त्यावरून देशातील मोठ्या शहरांमधील अंतराबाबतची संपूर्ण यादी लावलेली असायची.