असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल (E-Shram Portal) सुरू केलेले आहे. या पोर्टलला कामगारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत देशभरातील तब्बल 8.43 कोटी कामगारांनी ई-श्रमवर नोंदणी केली आहे. यातील 80.24 टक्के कामगारांनी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन (CSC सी एएस सी) पोर्टलवर नोंदणी केली, तर उर्वरीत कामगारांनी राज्य सेवा केंद्राच्या माध्यमातून नोंदणी केली आहे.
मार्गदर्शन शिबिराचे सुद्धा आयोजन केल्या जाते
याबाबत बोलताना सीएससीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी म्हटले आहे की, कामगार मोठ्या संख्येने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करत आहेत. सीएससी केवळ या कामगारांच्या नोंदणीचेच काम करत नाहीत, तर त्यांना विविध योजनांचे फायदे देखील समजाऊन सांगतात. योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. या कामगारांसाठी सीएससीच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते.
ई-श्रम पोर्टलवर कोणाला नोंदणी करता येते?
असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टची निर्मिती केली आहे. जो कोणी व्यक्ती असंघटीत क्षेत्रामध्ये काम करतो तो ई-श्रम पोर्टवर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टवर मोफत नोंदणी करता येते. या पोर्टलवर स्थलांतरीत कामगार, बांधकाम कामगार, शिवणकाम करणारे कामगार, नाव्ही, रिक्षाचालक, घरकाम करणारे मजूर, कचार गोळा करणारे कामगार, किरकोळ भाजी विक्रेते, फेरीवाले अशा सर्वच क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करता येते.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याने काय फायदे होणार?
18 ते 40 वयोगटातील कोणताही असंघटीत क्षेत्रातील व्यक्ती हा ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतो. ज्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. अशा कामगाराचा मृत्यू झाल्यास अथवा तो कायमस्वरूपी अपंग झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्यात येते. तसेच तो जर जखमी झाला तर त्याच्या कुटुंबाला एक लाखांचा मोबदला मिळतो. ई-श्रम पोर्टवर नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, आणि बँक खाते क्रमांक या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
Nice
Hi Deer sar
Sir plz i nid a job
Ukkadgaon, Tal Shrigonda, Dist Ahamdnager
Hi your
yiesefro 9ea660493d https://wakelet.com/wake/z5HsuxisQETT0GXDUs3KU
You need to be a part of a contest for one of the best blogs on the net. I will highly recommend this blog!