At a Time 4 Brothers MLA | देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सख्खे 4 भाऊ आमदार

At a Time 4 Brothers MLA बेळगाव मध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयामुळे जारकीहोळी बंधूंचे बेळगाव मधील राजकीय वजन पुन्हा एकदा समजून आले आहे. शिवाय 4 सख्खे भाऊ आमदार होण्याची देशांमधली ही पहिलीच घटना आहे.

सध्या जारकीहोळी कुटुंबातील तिघे विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी हे विधान परिषद सदस्य झाले आहेत. 2019 साली लखन यांनी गोकाक मतदारसंघांमधून विधानपरिषदेची पोट निवडणूक लढवली होती. भाऊ रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातच त्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार असलेल्या रमेश यांचा विजय झाला. त्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश लेखन एकत्र आले होते. या दोघांनी आपलेच बंधू व काँग्रेसचे उमेदवार सतीश यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सतीश यांचा पराभव झाला. या अशा परस्पर विरोधी राजकारणामुळेच जारकीहोळी बंदू राज्यात नेहमीच चर्चेत असतात. अशा स्थितीतही जारकीहोळी कुटुंबातील पाच जणांपैकी चौघेजण आमदार आहेत.

सर्वात मोठे रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भालचंद्र हे गोकाक मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. लखन हे मात्र अपक्ष म्हणून विधानपरिषदेवर निवडून गेलेले आहेत. सख्खे चौघे भाऊ आमदार होण्याचे हे देशातील दुर्मिळ उदाहरण होय.

हे चारही भाऊ गोकाक येथील जारकीहोळी कुटुंब आहे. त्यांचा राजकीय प्रवास विलक्षण आहे 1999 मध्ये रमेश जारकीहोळी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून केले. 2019 पर्यंत ते काँग्रेस पक्षातच होते व सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते पण 2019 आली त्यांनी काँग्रेस पक्षाचा व विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला व भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. भाजपकडून पोट निवडणूक लढवली व ते विजयी झाले पोटनिवडणुकीमध्ये लखन यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीत लखन यांच्या विजयात रमेश यांचाच मोठा वाटा आहे.

See also  ITI Recruitment Maharashtra 2023 | ITI भरती महाराष्ट्र 2023 |

सतीश व भालचंद्र साधी धर्मनिरपेक्ष जनता दलात होते भालचंद्र हे विधानसभा सदस्य तर सतीश हे विधान परिषद सदस्य व ते 2006 मध्ये सतीश यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता 2008 मध्ये यमकनमर्डी मतदारसंघांमधून विधानसभा निवडणूक लढविली व ते निवडून आले भालचंद्र यांनी 2008 मध्ये ऑपरेशन कमळ मध्ये जनता दल सोडून भाजप प्रवेश केला तेव्हापासून ते भाजप मध्येच आहेत.

राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार असताना सतीश यांना मंत्रिपद सुद्धा मिळाले होते ते जिल्हा पालक मंत्री होते 2008 मध्ये भाजप सत्तेत असताना भालचंद्र यांनाही मंत्रिपद मिळाले होते. रमेश काँग्रेसमध्ये असताना व भाजपमध्येही मंत्री झाले. परंतु लखन यांना अपक्ष निवडणूक लढविण्यास सांगून त्यांना विधान परिषदेवर निवडणूक निवडून आणण्यात रमेश यांचा प्रमुख वाटा असल्याचे बोलले जात आहे

सकाळ वृत्तपत्र

Leave a Comment