Aacharya Balshastri Jambhekar Sanman Yojana – आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना

Aacharya Balshastri Jambhekar Sanman Yojana – आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 11,000/- मानधन जाणून घ्या त्या विषयी माहिती जाणून घेऊया. आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000/- रुपये इतके मानधन देण्यास असा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 10 मार्च 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या अशा घटकांना सामाजिक सुरक्षा, सुविधा देण्याचा विचार शासनाच्या मनात होता आणि याच अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

2 फेब्रुवारी 2019 रोजी त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना ही योजना लागू करण्यात आलेली आहे 2018-19 साठी 15 कोटी आणि 2021- 22 करिता 10 कोटी असे एकूण 25 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. ही रक्कम नरिमन पॉइंट मुंबई तील इंडियन बँक या राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव स्वरूपात गुंतविण्यात आलेली आहे इतर राज्यातील पत्रकारांना सन्मान योजने अंतर्गत देण्यात येणारे मानधन विचारात घेता महाराष्ट्रातील पत्रकारांना या योजने अंतर्गत रुपये 11000/- दरमहा इतके अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मान्यता दिली आहे.

शासन निर्णय :
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने अशा घटकांना सामाजिक सुरक्षा सुविधा देण्याचा विचार करून ज्येष्ठ पत्रकार आणि प्रति आदरभाव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये. यासाठी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना रुपये 11000/- दरमहा इतके अर्थसाहाय्य देण्यात प्रशासनास मान्यता देण्यात येत आहे.

सदर खर्च सामान्य प्रशासन विभाग मागणी त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर नरिमन पॉईंट मुंबई येथील युनियन बँकेच्या खात्यामध्ये असलेली ती मुदत ठेव रक्कम 35 कोटी रुपये ही रक्कम याच्यासाठी वापरण्यात यावी अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय आपण mharashtra.gov.in पाहू शकता. तर मित्रांनो शासनाने हा असा निर्णय घेतल्यामुळे नक्कीच पत्रकारांना दिलासा मिळणार आहे.

See also  State Bank of India Mega Bharti | स्टेट बँक ऑफ इंडिया मेगा भरती |

Aacharya Balshastri Jambhekar Sanman Yojana ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे पण नक्की वाचा: शेतकरीअद्भुत मराठीआई मराठीयोगा

Leave a Comment