RTE 25% Admission Form Maharashtra 2022 | आरटी प्रवेश पोर्टल महाराष्ट्र 2022

RTE 25% Admission Form Maharashtra 2022 – RTE 25% टक्के प्रवेश 2022 करिता मुदतवाढ…! इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश ऑनलाइन अर्ज सुरू…..

मित्रांनो, RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2022-23 यासाठी ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेली आहे. या आरटीई अंतर्गत नामांकित इंग्रजी शाळांमध्ये बालकांना मोफत प्रवेश मिळत असतो. तर हा मोफत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची काय पात्रता असावी लागते? उत्पन्न किती असावे? कोण कोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहे? ऑनलाइन अर्ज कसा करावा? शाळांची निवड कशी करावी? याविषयीचे संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

तुम्ही जर यावर्षी आरटीईअंतर्गत आपल्या बालकांचा प्रवेश करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. त्यामुळे आपण ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो, RTE ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2022-23 मध्ये पालकांच्या मनांमध्ये जे काही प्रश्न येतात त्यांची शंका आणि समाधान दूर करण्यासाठी ही माहिती आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत.

RTE प्रवेशास संबंधित दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे त्यामध्ये एक दुर्बल घटक आणि दुसरा म्हणजे वंचित घटक.

1) अ). 25% ऑनलाइन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत?
दुर्बल घटक आंतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापर्यंत आहे. अशा पालकांची बालके वंचित गटा अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके.

 ब ). वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटांमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो?
वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकां व्यतिरिक्त, वि.जा. अ) भटक्या जमाती, ब)भटक्या जमाती, क)भटक्या जमाती,
ड) इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास वर्ग (SBC), एच.आय.व्ही बाधित / एच.आय.व्ही. प्रभावित बालके यांचा समावेश आहे.
दुर्बल गटांमध्ये ज्या बालकांच्या पालकांचे किंवा ज्या बालकांचे पालन-पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न (एक लाखाच्या आत आहे.) अशा बालकांचा समावेश आहे.

See also  10th SSC Maharashtra Board Result 2022 | 10वी निकाल 2022

SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल (1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या) गटामधून प्रवेश अर्ज करता येईल.

2) कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत?
सर्व माध्यमांच्या सर्व बोर्डाच्या (राज्य मंडळ CBSE, ICSE, व IB सह ) विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग 1 ली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे. ( मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून )

3) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2022-23  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

4) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

5) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

6) 1 कि.मी, 1 ते 3 कि.मी आणि 3 कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

7) 3 कि. मी. पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला लॉटरी लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद  घ्यावी.

8) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

9) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

10) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

11) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

12) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

See also  Government Orders | सरकारी आदेश | Govt Results | सरकारी निकाल |

13) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

14) RTE 25% प्रवेश 2022-23 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 10 मार्च 2022 पर्यंत राहील.

15) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

16) सन 2022-23 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

17) सन 2022-23या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

18) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

19) प्रवेश मिळाल्याचे अर्जदारांना कसे करणार आहे तर सोडत लॉटरी झाल्यानंतर या बाबींची sms पालकांच्या मोबाईलवर येत असतात. जर sms नाही आला तर तुम्ही याच आरटी RTE पोर्टलवर ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता.

प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? तुम्ही अर्ज कसा करावा. पात्रता व निकष काय आहेत? या विषयीची सर्व माहिती तुम्हाला कळली असेलच.

तर ही RTE 25% Admission Form Maharashtra 2022 माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment