10th & 12th Examination 2022 Result News | 10वी आणि 12वीचा निकाल लागेल या तारखेला

10th & 12th Examination 2022 Result News – शिक्षकांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दहावी बारावीचे पेपर तपासण्यास शिक्षकांनी नकार दिला होता. त्यामुळे 10वी आणि 12वीचा निकाल उशिरा लागेल अशाप्कारे म्हटल्या जात होते. परंतु आता निकालाबाबत ची महत्वाची बातमी हाती आलेली आहे.  10वी आणि 12वीचा निकाल 10 जून पर्वी लावण्यात येणार आहे.

एका शिक्षकाकडे 250 पेपर तपासण्याची जबाबदारी असून विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्या सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत तपासणीवर बहिष्कार टाकला होता.  पण बोर्डाकडून आता राखीव 12 हजार शिक्षकांची मदत घेतली गेली आहे. एका शिक्षकाला 200 ते 250 पेपर तपासण्यास दिले आहेत.

पुणे राज्य शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार 12वी चा निकाल 10 जून आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पेपर तपासणार नाही अशाप्रकारे भूमिका घेतली असली तरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पेपरची तपासणी आणि निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही असे म्हटले आहे.

12वीची परिक्षा ही 4 मार्च रोजी सुरू झाली आणि 7 एप्रिल रोजी संपणार आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच 10वीची परीक्षा 15 मार्च पासून सुरू झाली आणि शेवटचा पेपर 4 एप्रिल रोजी होता.  कोरोनाच्या महामारी नंतर बोर्ड परीक्षा ऑफलाइन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या वर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन असल्याकारणाने दहावी आणि बारावीच्या टक्केवारी मध्ये वाढ होऊन 99 टक्‍क्‍यांपर्यंत रिझल्ट लागला होता. आता 12वी चा निकाल 10 जून पर्यंत जाहीर करण्यात येईल. 10 वी 12वी चा  शेवटचा पेपर होतो, त्यानंतर 60 दिवसानंतर निकाल जाहीर करण्याची प्रथा आहे. यावेळी 12वीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरू झाला, त्यामुळे आम्ही 10 जून पर्यंत निकाल जाहीर करणार आहोत आणि दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर 8 दिवसांनी लागणार आहे, अशाप्रकारे बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे. 10th & 12th Examination 2022 Result News ही माहिती आपल्याला कशी वाटली? नक्की कमेंट करुन सांगा

See also  Stone Rain is Falling From The Sky | आकाशातून दगडांचा पाऊस पडत आहे |

हे सुद्धा नक्की वाचा – लोणमराठीशेतकरी

Leave a Comment