The Indian Cricket Team Will Face The Challenge of Player Injuries In The New Year. | भारतीय क्रिकेट संघासमोर नव्या वर्षात खेळाडुंच्या दुखापतीचे आव्हान असणार आहे.
रोहित शर्मा याला झेल (Catch)घेताना दुखावत झाली होती. बांगलादेश त भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर यालाही दुखापतीचा सामना करावा लागला. हॅमस्टिंगमुळे तो बांगलादेश दौऱ्यातून बाहेर झाला. आता श्रीलंके विरुद्धच्या मालिकेत तो संघात त्याचा सहभाग नसेल. जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला असला तरी अद्याप मैदानावर परतण्यासाठी त्याला वेळ लागू शकतो. कारण बुरहानसोबत अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाला ही तंदुरुस्त झाला आहे. या दोघांनाही फिटनेस टेस्ट देण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बंगलोरमध्ये बोलवण्यात आले होते. परंतु दोघांनाही फिटनेस टेस्ट पास न करू शकल्याने त्यांना श्रीलंके विरुद्ध संधी दिली नाही. तसंच बुरहान आणि जडेजा यांच्याबाबतीत निवड समितीने घाई न करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते महत्त्वाच्या असणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे बुरहान आणि जडेजा यांना विश्रांती दिली जात असल्याचे म्हटले जाते. या शिवाय प्रसिद्ध असलेला कृष्णा पाठदुखीने त्रस्त आहे तसेच नवदीप सैनी मास पेशी दुखावल्याने बाहेर आहे मोहम्मद शमी सुद्धा खांद्याच्या दुखापतीचा सामना करत असल्यामुळे या आठ जणांपैकी केवळ कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी चा श्रीलंके विरुद्धच्या मालिकेत समावेश आहे. श्रीलंकेविरुद्ध तीन t20 आणि 3 एक दिवसीय सामन्याची मालिका मंगळवारी तीन जानेवारीपासून सुरू होणार आहे.