शिक्षकांची महाभरती २०२२ | Teacher’s Vacancy 2022

शिक्षकांची महाभरती २०२२ (Teacher’s Vacancy 2022)  :- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती देताना असे म्हटले आहे की 50% शिक्षक भरती लवकरच केली जाणार असून 80 टक्के भरती करता आली असली व आता सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड याची नोंदणी करण्याची प्रक्रिया चालू आहे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या नेमकी किती आहे हे निश्चित करून त्यानंतरच तीस टक्के भरती होईल असा देखील निर्णय आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे विधानसभेत बोलताना शालेय शालेय शिक्षण मंत्री यांनी असे देखील म्हटले आहे की परवानगी मिळाली तर आपल्या राज्यात शंभर टक्के भरती करण्याची तयारी शिक्षण विभागाचे आहे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग होऊन 50% भरती त्वरित करण्यात येईल व लवकरच शिक्षकांची कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल अशी माहिती शिक्षण शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिलेले आहे

आपल्या राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही :

शाळेमध्ये विद्यार्थी संख्या 20 आणि त्यापेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाही असा शासनाचा विचार आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं व त्यामुळे शाळा बंद होतील असे अनेक लोकांना व समाजांना वाटले होते परंतु शासन 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करणार नाही असा शासनाने निर्णय घेतलेला आहे पण ज्या शाळेत एक किंवा दोन विद्यार्थी त्याला योग्य ती वागणूक मिळेल का हा महत्त्वाचा मुद्दा शासनासमोर उभा राहिलेला आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करावा लागणार असल्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे तसेच चांगल्या प्रकारचे आणि दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री हे सरकार यांनी म्हटले आहे

याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.