State Last Home Minister Arrested By ED | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED ने केली अटक |
शरद पवार यांचे असे म्हणणे आहे की, “ईडीचे छापे आम्हाला नवे नाहीत व आम्हाला चिंता वाटत नाही” – परमबीर सिंहांची यांची या 7 कारणांमुळे झाली बदली. त्यावर अनिल देशमुख यांचे असे म्हणणे आहे की ,परमबीर सिंह इतके दिवस का शांत बसले होते .या दरम्यान, अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली होती असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या नंतर पुढे त्यांनी राजीनामा दिला आता ED च्या अटकेनंतर अनिल देशमुख पुन्हा चर्चेत आले. जेव्हा उद्धव ठाकरे सरकार खातेवाटप जाहीर झालं. तेव्हा गृहमंत्रि हे पद कुणाला मिळणार, याकडे सर्वांच लक्ष होतं. मात्र , राष्ट्रवादीचे काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्या खाद्यांवर हि गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.एकीकडे छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील अशा दिग्गजांची फळी राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांनी गृहमंत्रिपद अनिल देशमुखांकडे दिल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.अपक्ष आमदार म्हणून सुरुवात, पहिल्याच टर्ममध्ये युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री, मग शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश, नंतर आघाडीच्या प्रत्येक सरकारमध्ये महत्त्वाचं मंत्रिपद अशी प्रकारची कारकीर्द अनिल देशमुखांची यांची आजपर्यंत राहलेली आहे.
संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.