थंडीत कशाप्रकारे आपले आरोग्य जपायचे थंडीच्या दिवसात आपल्या हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे तसेच रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे शरीरातील अतिरिक्त चरबी कोलेस्ट्रॉलची वाढ याचं प्रमाण वाढत चालला आहे. पण आपल्या जीवनशैलीतील काही गोष्टीवर नियंत्रण आणल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे हे अतिशय गरजेचं असते त्याबाबत आपण जाणून घेऊया. अति प्रमाणात अल्कोहोल घेणे किंवा धूम्रपान करणे टाळा. आपल्या शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करणे. तसेच सतत ताण घेतल्याने हृदयाच्या दमण्यांना सूज येते त्यामुळे रक्ताच्या गाठी होतात. त्या पक्षात आपल्याला हार्ट अटॅक ची शक्यता वाढते. व हा ताण कमी करण्यासाठी वाचन गाणी फिरणं अशा वेगवेगळ्या मन रमणाऱ्या गोष्टी कराव्या. व तसेच आपली अपूर्ण झोपही हार्ट अटॅकचं कारण ठरू शकते त्यामुळे रात्रीच्या वेळी सात ते आठ तासाची झोप आवश्यक आहे त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका हा कमी होतो व तसेच रोजच्या आहाराकडे थोडे लक्ष द्यायला हवे आहारात मीठ साखर व आवश्यकते प्रमाणात वापरावा जास्त प्रमाणात वापरू नये. आहारात जास्त मीठ वापरल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो तर साखरेमुळे मधुमेहाची समस्या निर्माण होऊ शकते या दोन्ही गोष्टी हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकतात. म्हणून ह्या गोष्टी सहसा टाळा तसेच आपल्या वेळातला वेळ काढून दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करावा परंतु थंडीच्या दिवसात पहाटे किंवा रात्रीच्या गाळठ्यात व्यायाम करणं शक्यतो टाळा अशा प्रकारची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.