Majhi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra | या योजनेचे 50 हजार प्रोत्साहन पर मिळतील पालकांना

Majhi Kanya Bhagyashree Yojana या योजने करता फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या स्त्रीला मुलगी झाली असेल त्या आईचे व मुलीचे एकत्रित म्हणजे जॉईन खाते बँकेमध्ये असावे आणि त्यावर एक लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि पाच हजार रुपयांचा ओल्ड ड्रॉप दिला जाईल याचबरोबर मुलीच्या जन्मानंतर पालकांनी नसबंदी करून घेतल्यास 50 हजार रुपये मिळणार आहेत दुसरीकडे दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहेत माझी कन्या भाग्यश्री योजनेमार्फत राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.

कोणती कागदपत्रे लागतील?

या योजनेचा लाभ मिळण्याकरता लाभार्थ्यास

  • आधार कार्ड
  • मुलीचे व आईचे एकत्रित बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • एक पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवाशी असल्याचा
  • उत्पन्न दाखला

तिसरे मूल असले तरी केवळ दोन मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा