Maharashtra State Government Employees: Latest News | महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी: ताज्या बातम्या |

Maharashtra State Government Employees: Latest News | महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी: ताज्या बातम्या | सरकार गेल्या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता अनुज्ञय झाला परंतु सद्यस्थितीला राज्य कर्मचाऱ्यांना केवळ 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळाला आहे. परंतु अशातच महाराष्ट्र राज्य शासनातील पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, की महाराष्ट्र राज्यातील पोलीस, उपनिरीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक यांना आधी 5000/- रुपये प्रति वर्ष गणवेश भत्ता मिळत होता परंतु शासनाने आता 1000 /-रुपये यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने या अधिकाऱ्यांना आता 1000 रुपये वार्षिक गणवेश भत्ता अनुज्ञय राहणार आहे. तसेच गृह विभागाकडून याबाबत एक सुधारित असा निर्णय देखील घेण्यात आला पोलीस अधिकाराकडून वारंवार गणवेश भत्यासाठी वाढ केली जावी अशी मागणी केली जात होती. शेवटी गृह विभागाने याची दखल घेतली असून 1000/- रुपये गणवेश भत्त्यामध्ये वाढ अनुज्ञय केली आहे. निश्चितच आता गणवेश भात्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची असलेली मागणी ही अखेरकार पूर्ण झाली. आधी पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता देणे ऐवजी गणवेशाचे साहित्य उपलब्ध करून दिले जात होते. परंतु आता पोलीस कर्मचारी अधिकारी यांना गणवेश भत्ता दिला.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.