Grampanchayat Election Maharashtra 2022 आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे वर्चस्व का शिंदे गटाचे वर्चस्व अशा प्रकारे निवडणुका रंगणार आहेत ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होणार असून 18 डिसेंबरला मतदान होईल आणि 20 डिसेंबरला मतमोजणी होईल या निवडणुकीचे महत्त्वाचे म्हणजे 7751 ग्रामपंचायतचे सरपंच थेट आता जनतेतून निवडले जाणार आहेत काही दिवसांपूर्वी 1165 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक झाली.
शिवसेना कोणाची?
धनुष्यबाण कोणाचा शिवसेना कुणाची याबद्दल अद्याप निकाल लागला नसल्याने उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.