Free Laptop Yojana Online Form 2022 | मोफत लॅपटॉप योजना ऑनलाइन फॉर्म 2022 |आपण सर्वांना माहितीच आहे की अनेक विद्यार्थ्यांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते. लॅपटॉप घेण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये लागतात. त्यामुळे हे सामान्य घरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप घ्यायला परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन आपल्या सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी ३०,०००/- रुपये अनुदान दिले जाणार आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना समाज कल्याण विभागाकडून राबवले जातात व तसेच इतर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना असेल असं नाही. ही योजना आपल्या जिल्ह्यासाठी सुरू आहे की नाही याबाबत जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागात जाऊन विचारायचे आहे. या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत व तसेच या अर्जाची शेवटची तारीख याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ही योजना सध्या हिंगोली जिल्ह्यात राबवण्यात येत असून या योजनेचा लाभ म्हणजेच लॅपटॉप खरेदीसाठी अनुदान मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. योजनेची पात्रता विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील प्रवासी असणे आवश्यक योजनेचाSC/ST/OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच घेता येईल. योजनेचा लाभ वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.