Net Banking द्वारे कसा बदलायचा Mobile Number?
जर तुमची नेट बँकिंग Net Banking सुविधा चालू असेल तर तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल, कम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून आपल्या बँकेतील रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक अवश्य बदलू शकता.
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) नेट बँकिंग घेतली असेल तर तुम्हाला सर्वप्रथम www.onlinesbi.com या वेबसाईटला लॉग इन करावे लागेल त्यानंतर या ठिकाणी असलेल्या तुमच्या प्रोफाईल वर जावे लागेल. नंतर आपल्याला आपल्या पर्सनल डिटेल वर क्लिक करायचे आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रोफाइलचा पासवर्ड (Profile Password) भरावा लागणार आहेे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि जुना मोबाईल नंबर दिसेल. याठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलण्याचा ही पर्याय दिसेल यामध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलता येणार आहे.
Branch मध्ये जावून कसा बदलायचा Mobile Number?
याव्यतिरिक्त जर तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर केला नसेल किंवा तुम्ही इंटरनेट बँकिंग सुविधा घेतली नसेल तर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक बदलून घ्यावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक बदलण्याचा एक फॉर्म मिळेल. तो भरून सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून जसे की, आधार कार्ड झेरॉक्स, तुमच्या पासबुकची झेरॉक्स हे सोबत जोडून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक बदलू शकता.
ATM Card द्वारे कसा बदलायचा Mobile Number?
हेही तुमच्याकडून होत नसले तर तुम्ही तुमच्या एटीएम द्वारे सुद्धा मोबाईल क्रमांक बदलू शकता, परंतु त्यासाठी तुमच्याकडे जुना मोबाईल (Old Mobile Number)क्रमांक असणे खूप गरजेचे आहे बँकेकडे पूर्वीपासून रजिस्टर केलेला आहे जर तुमच्याकडे यापूर्वी रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक असेल तर तुम्हाला तुमचा नवा मोबाईल क्रमांक एटीएम ATM मध्ये जाऊन एटीएम कार्ड (ATM Card) द्वारे बदलता येणार आहे.
सर्वप्रथम एटीएम मध्ये एटीएम कार्ड टाकून पिन (PIN)एंटर करावा लागेल त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या मोबाईल क्रमांक बदलण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल त्यानंतर तुमच्या जुन्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी जाईल तो तिथे टाकून त्यानंतर तुमच्याकडून पुन्हा नंबर मागितला जाईल त्याची तुम्हाला पुष्टी करावी लागेल त्यानंतर एटीएमद्वारे तुमचा मोबाईल क्रमांक बदलला जाईल.
अशाप्रकारे मित्रांनो आपण आपला बँकेत रजिस्टर असलेला मोबाईल नंबर सहज बदलू शकता ह्या करता वरील तीन स्टेप आपल्याला फॉलो करावे लागतील त्यामुळे नक्की तुम्ही तुमचा बँकेमध्ये तुमच्या अकाउंट ला रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक बदलू शकाल. तुम्ही आमच्या शेतकरी Shetkaree व मराठी शाळा Marathi School या ब्लॉग ला सुद्धा अवश्य भेट द्या तुम्हाला आमचा How to Change Bank Account Mobile Number Online in Marathi? हा लेख कसा वाटला जरूर कमेंट करा