Central Government Senior Residency Scheme | केंद्र सरकारची वरिष्ठ निवासी योजना | या संपा दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टर सोबत चर्चा करून दोन दिवसात राज्यातील निवासी डॉक्टरांसाठी 1432 पदे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. या निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला होता त्यामुळे राज्य शासनाने आज रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. या रिक्त जागा भरण्यासाठी गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली 1432 एस आर पदांची निर्मिती वस्तीगृहाची दुरुस्ती, वस्तीगृहाची क्षमता वाढवणे, महागाई भत्ता, सातव्या वेतन आयोगानुसार करणे तसेच सहयोगी सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरा ,यासह इतर मागण्यासाठी निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते, व त्यातील निवासी डॉक्टरांची काही पदे भरण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे. राज्यभरात आरोग्य विभागाची 527 रुग्णालय आहेत. व या सर्व रुग्णालयांमध्ये जवळपास 46 हजाराहून अधिक बेड उपलब्ध आहेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्षाकाठी बाहेर रुग्ण विभागात जवळपास साडेतीन कोटी रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. तर सुमारे 9000 छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त अभियान राष्ट्रीयकृष्ट रोग निर्मूलन राष्ट्रीय क्षय रोग या विविध राष्ट्रीय कार्यक्रम तसेच आरोग्यविषयक राज्य उपक्रम हिवताप , हत्तीरोग ,चिकनगुनिया सह विविध साथीचे रोग तसेच मधुमेह व रक्तदाबासह असंसर्गजन्य आजारापासून कर्करोगापर्यंत अनेक आजारावर आरोग्य विभाग सातत्याने काम करी त आहे, आरोग्य विभागाच्या कामाची वाढती व्याप्ती लक्षात घेता. ताबडतोब डॉक्टर पासून लिपिक पर्यंतची सर्व पदे भरण्याची गरज असल्याचे निवासी डॉक्टर यांनी सांगितला आहे.