Punjab National Bank Recruitment 2022 | पंजाब नॅशनल बँक भरती

Punjab National Bank Recruitment 2022 पंजाब नॅशनल बँक भरती : बँकेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता आम्ही घेऊन आलो आहोत सुवर्णसंधी….!
देशातील नामांकित बॅंकांपैकी पंजाब नॅशनल बँक ही एक नामांकित बँक आहे. पंजाब नॅशनल बँक Punjab National Bank मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती निघणार आहे. यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.

जाणून घ्या कोणत्या पदासाठी भरती असणार :

सफाई कामगार (Sweeper / Cleaner) – एकूण जागा 33

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

सफाई कामगार (Sweeper / Cleaner)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवाराचं जास्तीत जास्त शिक्षण हे बारवीपर्यंत असणं आवश्यक आहे. त्यावरील शिक्षण असलेले उमेदवार भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत.

उमेदवारांना इंग्रजी भाषेचं वाचन आणि लिखाणाइतकं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या अधीन असलेल्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ज्या जिल्ह्यांसाठी जागा रिक्त आहेत. उमेदवार हे त्याच जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.

एकूण जागांपैकी काही जागा या माजी सैनिकांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.

उमेदवारांची निवड ही त्यांच्या मार्कांच्या आधारे केली जाणार आहे.

वयोमर्यादा :
सफाई कामगार (Sweeper / Cleaner)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे तर OBC उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार भरती :
सफाई कामगार (Sweeper / Cleaner) :
ठाणे, पालघर, रायगड.

आवश्यक कागदपत्रं :
1) Resume (बायोडेटा)
2) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6) पासपोर्ट साईझ फोटो

See also  Barti Schoolarship After 10th Class दहावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये स्कॉलरशिप

अर्ज पाठवण्याचा पत्ता:
मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051.

Punjab National Bank Recruitment 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment