Post Office Recruitment 2023 Maharashtra | पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र |

Post Office Recruitment 2023 Maharashtra | पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र |

विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता इंडियन पोस्ट मध्ये मोठ्या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीमध्ये खास गोष्ट अशी आहे की,  दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतील. व या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतील . या भरती अंतर्गत आता विविध विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरी प्राप्त करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. इंडिया पोस्ट विभागांतर्गत भारतीय पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर अशी विविध पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी 40889 रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचे असेल, त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडियन पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल. इंडियन पोस्ट भरती अंतर्गत रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेले आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी व्हायचे असेल. त्यांनी लवकरच आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही या भरतीसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही पुढील वेबसाईटला जाऊन भेट देऊ शकता.

अधिकृत website बघण्यासाठी येथे Click करा. 

इंडियन पोस्ट अंतर्गत जी भरती होणार आहे या भरतीसाठी 27 जानेवारी 2023 पासून अर्ज चालू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत राहील यामध्ये जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्यावा.

 इंडिया पोस्ट भरतीसाठी काही महत्त्वाच्या अटी .

  • या भरतीसाठी फॉर्म भरताना दहावी मध्ये गणित आणि इंग्रजी विषय हे असणे अनिवार्य आहे.

  • या भरतीसाठी फॉर्म भरताना अर्जदाराने मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

  • या भरतीसाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 40 वर्ष यामध्ये असले पाहिजे. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यामध्ये सवलत मिळणार आहे.

  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही आपल्या गुनाद्वारे केली जाणार आहे.

  • आपल्याला दहावी मध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे आपले निवड प्रक्रिया केली जाणार आहे. आणि यानुसार पदांसाठी निवड केली जाईल. या भरतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज हे ऑनलाइन करायचे आहेत.

  • विद्यार्थी मित्र हे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार नाहीत.

  • या भरतीसाठी निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी ही 30 जून 2023 पर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यावा.

 

See also  Indian Post Requirement 2023 |  इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2023 |

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

 

 

Leave a Comment