Omkareshwar Live Darshan ओंकारेश्वर लाईव्ह दर्शन

Omkareshwar Live Darshan ओमकारेश्वर हे एक हिंदू मंदीर आहे चे मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यामध्ये आहे हे मंदिर नर्मदा नदी मध्ये मंधता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर हे एक मंदिर आहे. हे ठिकाण मोरटक्का गावापासून जवळपास बारा मैल अंतरावर आहे म्हणजेच 20 किलो मीटर अंतरावर आहे.

ओंकारेश्वर डोंगर फार मोठा आहे नर्मदा नदी काठी हा डोंगर असून त्याचा आकार ओम सारखा आहे. ओंकारेश्वर ला एकूण 68 तिर्थ आहेत. याशिवाय तेथे दोन ज्योती स्वरूप लिंगा सहित 108 प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्य प्रदेशामध्ये प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंगे आहेत, एक म्हणजे महाकाल नावाचे उज्जैन मध्ये तर दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये येथे एका विशिष्ट दिवशी मातीची 18000 शिवलिंगे तयार करून पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जन करण्याची प्रथा आहे. राजा मांधाता ने नर्मदा किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपश्चर्या करून भगवान शंकरास प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले आणि तेव्हापासून हि तीर्थ नगरी ओमकार मांधाता या नावाने ओळखले जात आहे.

तुम्हाला जर ओंकारेश्वर ला जायचे असेल तर इंदूरपासून 77 किलोमीटर इंदूर खंडवा या महामार्गावर आहे.

ओंकारेश्वर रोड या रेल्वे स्थानकापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे.

खंडवा या शहरापासून ओंकारेश्वर 72 किलोमीटर अंतरावर आहे.

तुम्हाला उज्जैन होऊन इंदूर मार्गे ओंकारेश्वर ला बस ने पोहोचता येते.

ओंकारेश्वर लाईव्ह दर्शनाकरता येथे क्लिक करा

तुम्ही आमच्या योगा टिप्स Yoga Tips आणि मराठी आई मराठी Aai Marathi या ब्लॉग ला सुद्धा भेट देऊ शकता

 

See also  12 Jyotirling बारा ज्योतिर्लिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x