Lal Mahal Pune लाल महाल, पुणे

लाल महाल Lal Mahal Pune हा पुणे येथील छोटीशी वास्तू असून ती पुण्याच्या मध्यभागी आहे. तसेच ते जिजामाता उद्यानात आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महलच्या समोर पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रोड आहे. शिवाजी महाराजांचे बालपण येथेच गेले.

Lal Mahal Pune लाल महाल, पुणे

लाल महालाबद्दल बोलायचे झाले, तर सध्याचा लाल महाल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने 1988 साली फक्त लहान मुलांसाठी जिजामाता उद्यानात उभारले. शिवाजी महाराजांच्या काळातील लाल महल सध्या अस्तित्वात नाही. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी बांधलेला लालमहल नेमका कोठे होता? याची उत्सुकता शिवप्रेमींना असते. ती शोधून काढणे आता शक्य नाही. वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांचे एकत्रित मूर्ती उभारली होते. संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी आंदोलन करून दोन हजार दहा वर्षे शिल्पातून दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा उकडून टाकळी ते विद्रूप शिल्प त्यानंतर दुरुस्त झालेच नाही असे म्हटले जाते.

लाल महालाचा इतिहास History of Lal Mahal

लालमहल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी केली आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळ शनिवार वाडा आहे. तसेच पुण्यातील शिवाजी महाराज रस्ता हा खूप नावाजलेला आहे. लाल महालात शिवाजी महाराजांचे बालपण गेले. शिवाजीच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यावेळी त्यांनी आपला मामा शाहिस्तेखान याला महाराजांवर चालून येण्यास सांगितले. “शिवाजी तो चूहा है | खाविंद लाऊंगा उसको” शाहिस्तेखान औरंगजेबास म्हणाला होता.

शाहिस्तेखान दिल्लीवरून एका लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला. त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते म्हणजे पुण्यातील लालमहल. तोपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की, शाहिस्तेखान पुण्यात उच्छाद मांडत आहे.

See also  थंड झालेला चहा पुन्हा गरम करून का पिऊ नये? Cold Tea Hot Tea

दरम्यान शाहिस्तेखानाने पुण्यात वाजवण्यास सुरुवात केली होती. त्याने अनेक ठिकाणची गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले होते. तीन वर्षे शाहिस्तेखान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना चिथावणी देत होता. त्यांनी ओळखले होते की, शिवाजीचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून तो त्याच्या प्रजेला त्रास दिल्याशिवाय सापडायचा नाही.

त्यामुळे शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकविण्यासाठी युद्धनीती आखली आणि ते अवघ्या निवडक 400 विश्वासू मावळ्यांना घेऊन लाल महालात अतिशय शिताफीने शिरले आणि शाहिस्तेखानची धांदल उडाली या लढाईत शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली. तसेच या लढाईत शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला.

त्याच्या बेगम मृत्युमुखी पडल्या. याचा शाहिस्तेखानाला जबर हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी लाल महाल मुक्त केला. आज या घटनेला 350 वर्ष होत आहे. इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम शिवाजी महाराजांनी लाल महालात केली.

याची साक्ष असून ही वास्तू अभिमानाने उभी आहे. या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात आक्रमकतेने येते. कारण एक लाख सैन्य असताना अवघ्या 400 मावळ्यांना घेऊन विजय संपादन करणे हे अजून तरी कोणाला शक्य झालेले नाही. या कारणामुळे औरंगजेबाला आश्चर्यमिश्रित धक्का बसला. राजमाता जिजाऊ साहेब यांनी बांधलेला लाल महल सध्या अस्तित्वात नाही. त्या जागी सध्याची लाल महालाची प्रतिकृती पुणे महानगर पालिकेने बांधलेली आहे.

लाल महालावरील महाराजांच्या छाप्याच्या बाबतीत मोगलांची प्रतिक्रिया काय फक्त घबराहट, दहशत. दिल्लीतील दोन युरोपियन डॉक्टर आणि डॉक्टर सिडने ओवेन या दोघांनी या लाल महल छापा प्रकरणी लिहून ठेवला आहे. या छाप्याची दहशत एवढी निर्माण झाली आहे की, शिवाजी हा नक्कीच जादूगार असावा असे लोकांना वाटते, त्याला पंख असावेत त्याला गुप्त होता येत असावे.

म्हणजे केवळ अफवा कंड्या आणि अतिशयोक्ती शाहिस्तेखान मात्र कायमचा दुःखी झाला. त्याला आपल्या पराभवा पेक्षा भयंकर कायमची होत असणारी थट्टा, कुचेष्टा असहाय्य होत असणार, प्रत्येक घासाला त्याला आठवण होत असेल शिवाजी महाराजांची उजव्या हाताची तीन बोटे तुटली.

See also  Prakash Amte प्रकाश आमटे

खानाच्या बाबतीत आणखी एक दुःख झालं ते म्हणजे लाल महालात आणि या भूमीवर पडल्या, लाल महालात उसळलेल्या भयंकर कल्लोळ त्याची एक बायको ठार झाली आणि मुलगा अबुल फतेखान हा तर महाराजांच्या हातूनच मारला गेला. हा सर्व प्रकार लालमहालात घडला त्याचा प्रत्येक पुणेकर आणि महाराष्ट्रीय माणसाला अभिमान आहे. पुण्यातील लाल महल हे प्रत्येक शिवप्रेमींसाठी अत्यंत अभिमानाची वास्तू आहे.

खानाची बोटे कापली

शिवाजी महाराजांनी चारशे मावळ्यांसह लहान मुला खान असलेल्या ठिकाणी प्रवेश केला. तेव्हा रोझाचा उपवास दिवसभर असल्यामुळे तेथील सर्वच लोक संध्याकाळी भरपूर जेवण करून सुस्त पडले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी हा बेत आखून खानला मारण्याचा मसुदा आखला. शिवाजी महाराजांनी महालात प्रवेश केला व मनातील सर्व सैनिक सैरावैरा धावू लागली. खान जिन्याने धावत होता. महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते.

खान पुढे आणि महाराज मागे असा प्रकार होता. गोंधळलेला खान केवळ जीव वाचविण्याकरताच पळत होता. स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला. खान घाबरून धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले. पडद्याला पडलेल्या भगदाडातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली. तिथं असलेली शमादाने कोणा शहाण्या स्त्रीने फुंकून विझविली. अधिकच अंधार झाला. महाराज आता अंदाजाने खानावर धावत होते. महाराजांना वाटले खान येथेच आहे.

म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला. घाव लागल्याचे त्यांना जाणवले. त्यांना वाटले घाव वमीर् लागून खान मेला. महाराज तेथून तडक आल्यावाटेने परत परतले. संपूर्ण लाल महालाची वास्तु भयंकर कल्लोळाने दणाणत होती. त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता. महाराजांचा मुख्य उद्देश मात्र अंधारात अधांतरीच राहीला. खान बचावला. त्याची फक्त तीन बोटे, उजव्या हाताची तलवारी खाली तुटली. आपले छाप्याचे काम फत्ते झाले असे समजून पूर्व योजने प्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निसटले.

सध्याचा लाल महाल Lal Mahal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची साक्ष असणाऱ्या लाल महालाची संपूर्ण डागडुजी करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. लाल महालाच्या अवती भवती सुरक्षिततेच्या कारणास्तव विनाकारण उभारण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या आणि तारेचे कुंपणही काढण्याच्या सूचनेचाही त्यात समावेश आहे. महाराजांनी लाल महाल येथून स्वराज्याची पायाभरणी केली.

See also  Pradhanmantri Matritva Vandana Yojana Information in Marathi language | प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

याच भागात महाराजांनी सोन्याचा नांगर फिरविला. लाल महालाला दररोज हजारो नागरिक भेट देतात. या महालात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा पुतळा तसेच रायगड किल्ल्याची प्रतिकृती आहे. तसेच, महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास पर्यटकांना समजावा, यासाठी महापालिकेने काही वर्षापूर्वी लाल महालाच्या पहिल्या मजल्यावर शिवसृष्टी उभारली आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून या शिवसृष्टीला सील ठोकले असून, रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीची रंगरंगोटी न केल्याने पर्यटकांच्या पदरी निराशा पडत आहे. या बाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर जागे झालेल्या महापालिकेने शिवसृष्टीचे टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी लाल महालाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी मुख्य सभेत करून यावर आवाज उठविला होता.

शहरात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने लाल महालातील सुधारणेबाबत महापौरांकडे मागणी केली होती. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या चर्चा संपूर्ण देशात पसरली आहेत. तुम्ही या लाल महालाला नक्की भेट द्या व आनंद घ्या. तसेच इतिहासातील काही रोचक घटनांचा अनुभव घ्या.

“तुम्हाला आमचा लेख लाल महाल विषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment