Asirgarh fort असीरगड किल्ला

चला तर आज आपण अशा एक किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत की त्यामागे काहीतरी रहस्य लपलेले आहे आणि या रहस्याचे काहीतरी गूढ आपणास समजणे महत्वाचे आहे. या सृष्टीमध्ये बऱ्याच प्रकारचे रहस्य लपलेले आहेत काही विज्ञानाच्या विश्वासावर तर काही निसर्गाच्या आधारे.

Asirgarh fort असीरगड किल्ला

ठिकाण मध्य प्रदेश.मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला. बुरहानपूरपासून उत्तरेला २० किमी. अंतरावर समुद्रसपाटीपासून सु. ८५० फूट उंचीवर हा अभेद्य किल्ला आहे. आसा अहिर या अहिर राजाच्या नावावरून सातपुडा डोंगररांगेतील या किल्ल्याला असीरगड किंवा असीरगढ हे नाव प्राप्त झाले.

आशिरगड किल्ला हा तीन भागांत विभागला असून किल्ल्याभोवती दुहेरी तटबंदी आणि बालेकिल्ला अशी विभागणी आहे. त्यामुळे एकात एक असे तीन स्वतंत्र किल्लेच तयार झाले आहेत. पायथ्याजवळचा मलयगड,मधला कमरगड आणि त्यांचा मुकुटमणी म्हणजे असीरगड.

पायथ्याच्या असीरगड गावातून पायऱ्यांच्या वाटा लागतात.या वाटेने किल्ल्यावर जाताना एका पाठोपाठ एक अशी भक्कम दरवाजांची मालिका आहे. यांपैकी मदार दरवाजा, हप्त दरवाजा हे प्रसिद्ध आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी एक गाडीमार्ग असून तो मार्ग लांबचा व गडाच्या मुख्य डोंगराला वळसा घालून बालेकिल्ल्याजवळ पोहोचतो.

बालेकिल्ल्यावर जाताना अकबर, दानियाल, शाहजहान आणि औरंगजेब यांचे चार फार्सी भाषेतील शिलालेख आहेत. किल्ल्यामधील भव्य वास्तू म्हणजे जामा मशीद. ही वास्तू म्हणजे फारुकी शासन काळातील बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सदर मशिदीचे बांधकाम काळ्या दगडात असून मशिदीच्या दोन्हो बाजूस ८० फूट उंच दोन मिनार आहेत.

असीरगड किल्ल्यावर पाण्याची उत्तम सोय आहे. किल्ल्यावर सहा तलाव असून काही विहिरी देखील आहेत. किल्ल्यावर एक शिवमंदिर आहे आणि त्याच्या जवळच किल्ल्यावर येणारा आणखी एक मार्ग आहे. सध्या हा मार्ग बंद आहे. या मंदिरात अश्वत्थामा येऊन पूजा करत होता, अशी आख्यायिका आहे.

मंदिराजवळ एक मोठा बुरूज असुन मंदिराचे बांधकाम मात्र मराठाकालीन दिसते. ब्रिटिश लोकांचे या गडावर अनेक वर्षे वास्तव्य होते. किल्ल्यावर ब्रिटिशांनी बांधलेल्या बराकी, कैदखाने आणि चर्च यांचे अवशेष दिसतात. तसेच गडावर एक ब्रिटिशकालीन दफनभूमी आहे. किल्लाच्या पायथ्याशी मोगलकालीन ‘मोती महाल’ नावाची इमारत आहे.

Asirgarh fort गडातील काही पुरावे

पूर्व मध्ययुगीन कालखंडातील या स्थळाच्या अस्तित्वाचे पुरावे नाणी, देवदेवतांच्या मूर्ती, मंदिराचे अवशेष इत्यादी रूपांत येथे उत्खननात सापडले.

या किल्ल्याला खरी ओळख दिली, ती फारुकी राजवटीतील शासनकर्त्यांनी. त्यांचे पूर्वज खल्जी, तुघलक यांसारख्या परकीय आक्रमणकर्त्यांसोबत हिंदुस्थानात आले आणि त्यांनी दिल्ली दरबारात स्वत:चे स्थान निर्माण केले.

१३७० साली फारुकी सरदार मलिक राजा याला तुघलक सुलतानाने गुजरातच्या दक्षिण सीमेलगतच्या प्रांताची जहागिरी दिली.

त्याने जहागिरीचे मुख्यालय थाळनेरला (सध्या जि. धुळे, महाराष्ट्र) स्थापन केले. तुघलकांची सत्ता खिळखिळी होताच मलिक राजाने स्वत:ला स्वतंत्र संस्थानिक घोषित करून फारुखी साम्राज्याची स्थापना केली.

१३९९ साली त्याचा मुलगा नासिर खान गादीवर बसला. नासीर खानने किल्लेदार आसा अहीर याच्याकडून कपटाने असिरगड किल्ला घेतला.

नासिर खान स्वत:ला मुसलमानांचे दुसरे खलिफा ‘उमर-अल-फारुख’ यांचा थेट वंशज समजत असे. त्याची सुरुवातीची काही वर्षे अंतर्गत कलह मिटविण्यात गेली. थाळनेरवर आक्रमण करून त्याने भावाला कैद केले.

पुढे बहमनी फौजेकडून पराभव पतकारावा लागल्यानंतर बसलेल्या धक्क्यामुळे १४३७ साली त्याचा मृत्यू झाला. दोनशे वर्षाच्या फारुकी शासनकाळात एकूण बारा सुलतान झाले. १५७६ साली गादीवर बसलेल्या राजा अली खानने (आदिल शाहा) मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले. स्वतःच्या मुलीचे लग्न अकबरचा दुसरा मुलगा शहाजादा मुराद सोबत लावून दिले. स्वत: अकबरच्या वजिराच्या बहिणीसोबत लग्न केले. मोगलांच्या वतीने युद्धात लढतानाच त्याचा मृत्यू झाला.

See also  Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ला

पुढे त्याचा मुलगा ‘बहादूरखान’ याने कारभार हाती घेतला. वडिलांच्या विरुद्ध नीती अवलंबून त्याने मोगलांच्या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला.

त्यामुळे मोगल बादशहा अकबराचा मुलगा दानियालचा अपमान झाला. परिणामस्वरूप खुद्द अकबर त्याच्यावर चालून आला. बहादूरखानाला हे अपेक्षितच होते.

युद्धाच्या तयारीने तो १५००० फौजेनिशी असीरगडवर तयार होता. सोबत व्यापारी, कारागीर, गुरेढोरे असा बराच लवाजमा होता. किल्ल्याच्या आश्रयाने मोगलांना बराच काळ झुंजत ठेवू अशी त्याची अटकळ होती, पण ती फोल ठरली.

१६०० साली अकबराने किल्ला जिंकला. याबाबत पर्शियन इतिहासकार फिरिश्तानेही नोंद करून ठेवली आहे. ‘किल्ल्याला वेढा घालून बरेच महिने झाले. पावसाळ्यानंतर कसल्या तरी रोगाचा प्रसार झाला आणि किल्ल्यातील जनावरे मृत्यू पडू लागली आणि कुजून दुर्गंधी पसरली. त्यात कोणीतरी बातमी पेरली की, हे सगळे अकबर त्याच्या जवळच्या मांत्रिकामार्फत घडवतोय, या बातमीवर सैन्यांचा विश्वास बसला. खुद्द फारुकी सुलतान बहादूरखान कामकाज सोडून यावर उपाय शोधण्यात गुंतला.

यापेक्षा त्याने मेलेली जनावरे बाहेर फेकण्याची, रोगराई फैलू नये म्हणून हकिमाकरवी उपचाराची, बिनकामी जनावरे, माणसे गडाखाली धाडण्याची आज्ञा द्यायला हवी होती. आगाऊ पगार देऊन सैन्याला प्रोत्साहित करायला हवे होते. पण त्याने काहीच केले नाही. त्याच्याकडे धनसंचय भरपूर होता.

दहा वर्षे पुरेल एवढे धान्य आणि आणखी एखादे नवीन शहर वसविता येईल, एवढा खजिना होता. सुलतान काहीच करत नाही, हे बघून इकडे सैन्याने त्यालाच कैद करून अकबराला सोपविण्याचा कट रचला.

स्वत:चे सैन्यच विरोधात उभे ठाकलेले पाहून त्याने शरणागती पतकरली. सैन्यासह स्वत:ला जिवंत किल्ल्याबाहेर जाऊ द्यावे, अशी त्याची अट होती. अकबराने सैन्याला किल्ला सोडून जाऊ दिले, पण बहादूरशाहाला कैदेत टाकले व त्याची संपत्ती जप्त केली.

धान्य, पाणी, दारूगोळ्यासह लढण्यासाठी पूर्ण सज्जता आणि सैनिकी सामर्थ्य असूनही केवळ बहादूरशाहाच्या नाकर्तेपणामुळे फारुकी साम्राज्याचा अंत झाला. विजयाने आनंदित झालेल्या अकबराने त्याचे गुणगान गाणारा शिलालेख गडाच्या दरवाजावर बसविला. ‘जर्ब असीर’ (असीरला नमवले) हे शब्द असलेली सोन्याची नाणी पाडली.

बलाढ्य ठिकाण झडप घालून गारद करणार्‍या बहिरी ससाण्याचे चिन्ह नाण्याच्या दुसर्‍या बाजूला होते.ʼ पुढे किल्ला पेशव्यांचे सरदार शिंदेंच्या ताब्यात होता. पेशवे दुसरे बाजीराव किल्ल्याजवळील धुळकोट गावी ब्रिटिशांना शरण गेले (जून १८१८).

१८५७ सालच्या उठावातील वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशीचा किल्ला पडल्यानंतर काही काळ येथे मुक्कामाला होत्या. पुढे उठावात सहभागी झालेल्या कित्येकांना ब्रिटिशांनी अटक करून येथेच कैदेत ठेवले. त्यात सुरेंद्र साए ही ओडिशामधील राजघराण्यातील व्यक्तीही होती. या पराक्रमी योद्ध्याचा येथे कैदेतच २० वर्षांनंतर मृत्यू झाला.

आता महत्वाचे म्हणजे आपण पाहणार आहोत की या गडाविषयी आणखी काय अद्भुत असे आहे की याबद्दल आपण अपरिचित आहोत,ते म्हणजे द्वापारयुगामध्ये एक योद्धा होऊन गेला त्याचे नाव अश्वत्थामा होय.

आपल्या देशात अनेक अद्भूत आणी अलौकिक मंदिरे आहेत. यामध्ये एक मंदिर असे आहे, ज्याचा थेट संबंध महाभारताशी आहे. या मंदिराचे एक खास वैशिष्ट म्हणजे येथे गेल्या ५ हजार वर्षांपासून दररोज न चुकता महाभारतातील एक योद्धा पूजा करण्यासाठी आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी येतो, अशी मान्यता आहे. कोण आहे तो योद्धा आणि नेमक्या कोणत्या शिवमंदिरात दर्शनासाठी येतो? जाणून घेऊया…

भारतात संस्कृती, परंपरा, प्राचीन ग्रंथ, पुराणे यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. महाभारत भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेले आहे. युग लोटले, तरी त्याविषयीची जिज्ञासा, लालसा आणि गोडी कमी होत नाही.

See also  झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाचे पुढे काय झाले? Jhanshi Rani Laxmibai

महाभारतातील अनेक गोष्टी आजच्या काळातही आपल्याला अचंबित करत असतात. जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात म्हणजेच मंगळवार, २१ जुलै २०२० पासून व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांनी भारलेला श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यातील शिवपूजनाला विशेष महत्त्व प्राप्त होते, असे सांगितले जाते. उत्तर भारतात ६ जुलै २०२० पासून श्रावण महिना सुरू झाला आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शिवस्थाने म्हणजे १२ ज्योतिर्लिंग.

या १२ ज्योतिर्लिंग मंदिरांप्रमाणे देशभरातील छोट्या-बड्या सर्व शिवमंदिरांमध्ये श्रावण महिन्यातील सोमवार उत्साहात साजरे केले जातात. श्रावणी सोमवारी शिवाला वाहिलेले बेल, अभिषेक यांमुळे महादेवाची विशेष कृपाशिर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. आपल्या देशात अनेक अद्भूत आणी अलौकिक मंदिरे आहेत. यामध्ये एक मंदिर असे आहे, ज्याचा थेट संबंध महाभारताशी आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर वसलेल्या बुऱ्हानपूर जिल्ह्यातील असिरगडावर हे शिवमंदिर आहे. या मंदिराचे नाव असिरेश्वर किंवा गुप्तेश्वर महादेव मंदिर असे आहे. असिरगड किल्ला बुऱ्हानपूरच्या उत्तरेस सुमारे २० कि.मी. सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे. रामायण आणी महाभारत यांचा थेट संबंध असल्याचे अनेक अवशेष पुरातत्व विभागाला या मंदिर परिसरात मिळाले आहेत.

शिवशंकराच्या याच गुप्तेश्वर किंवा असिरेश्वर महादेव मंदिरात महाभारतातील एक महान योद्धा, द्रोणाचार्य यांचा पुत्र ‘अश्वत्थामा’ दररोज न चुकता दर्शनसाठी येतो, अशी मान्यता आहे. आजच्या विज्ञान युगात काही जणांना ही गोष्ट हास्यास्पद वाटू शकेल; परंतु, येथे गेल्यावरच आपल्याला कळते की, विज्ञानाच्या पलीकडेही अनेक गोष्टी असतात. तर अगोदर आपण अश्वत्थामा या योध्याबद्दल थोडी विश्लेषणात्मक माहिती पाहुयात आणि त्यानंतर सविस्तर माहिती घेऊया

अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. याच्या कपाळावर जन्मापासूनच एक मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता.

कौरव-पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खाऊ लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठाऊक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिङ्‌मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता.

द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने ‘अश्वत्थामा मेला’ अशी आवई उठवली.

रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारले की खरेच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता “अश्वत्थामा मेला खरा, पण ‘नरो वा कुंजरो वा'” असे उत्तर दिले.

त्या वाक्यातला ’अश्वत्थामा मेला’ एवढेच शब्द ऐकून, मानसिक धक्का बसलेले द्रोणाचार्य यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.

अश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला “पांडवांची शिरे कापून आणतो” असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले.

आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला शोधत आले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो.

परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानले जाते. अश्वत्थामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.

See also  Baji Pasalkar बाजी पासलकर

आता आपण सविस्तर माहिती पाहू की सध्याच्या काळात हा योद्धा कुठे असेल ते अश्वत्थामा हा महाभारत काळातील द्वापारयुगामध्ये जन्मला होता. त्याला त्यावेळी श्रेष्ठ योध्यांमध्ये गणले जात असे. तो गुरु द्रोणाचार्याचा पुत्र आणि कुरु वंशाचे राजगुरू कृपाचार्याचा भाचा होता.

गुरु द्रोण यांनी कौरवांना आणि पांडवाना शस्त्र विद्येमध्ये पारंगत बनवले होते. महाभारताच्या युद्धाच्या वेळी गुरु द्रोणाचार्याने हस्तिनापुर राज्याशी असलेल्या निष्ठेमुळे कौरवांची साथ देणे योग्य समजले.

महाभारतात अनेक शूरवीर, पराक्रमी योद्धे झाले. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अश्वत्थामा. गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र असलेला अश्वत्थामा युद्धशास्त्र, शस्त्रास्त्रकलेत अगदी निपुण होता. याशिवाय तो महादेव शिवशंकराचा परमभक्तही होता. महाभारत युद्धात गुरु द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा कौरवांच्या बाजूने लढले.

पांडवांचे मनोबल एकट्या अश्वत्थामाने खच्ची करण्यास सुरुवात केली, तेंव्हा श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठीरला कुटनीती करण्यास सांगितले. या योजनेनुसार, श्रीकृष्णांनी रणांगणात अश्वत्थामा मारल्या गेल्याची बातमी पसरवली. द्रोणाचार्यांनी जेंव्हा युधिष्ठीराला याबाबत विचारले, तेव्हा युधिष्ठीर म्हणाला की, होय अश्वत्थामा मारल्या गेला. परंतु, तो मानव होता की हत्ती हे मला माहित नाही. कारण महाभारतात अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता.

अश्वत्थामा मारला गेल्याचे ऐकताच द्रोणाचार्यांना तीव्र धक्का बसला. पुत्रवियोगाने भावूक झालेल्या द्रोणाचार्यांना काहीच सुचत नव्हते. याचाच फायदा घेत पांचाल पुत्र धृष्टद्युम्न याने आचार्य द्रोण यांचा वध केला. आपल्या पित्याच्या वधाची वार्ता समजताच अश्वत्थामा अतिशय विचलित झाला.

आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याने सर्व पांडव पुत्रांचा वध करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर अश्वत्थामाने पांडवांचा संपूर्ण वंश नष्ट करण्यासाठी उत्तरेच्या गर्भात वाढत असलेल्या अभिमन्यू पुत्र परीक्षिताला मारण्यासाठी गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले.

श्रीकृष्णाचा शाप

श्रीकृष्णाने तात्काळ आपल्या शक्तीचा वापर करत उत्तरा आणि तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या परीक्षिताचे रक्षण केले. मात्र, दुसरीकडे अश्वत्थामाच्या या कृतीचा श्रीकृष्णाला अतिशय राग आला. प्रचंड क्रोधात आणि अश्वत्थामाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने शाप दिला.

या शापानुसार, अश्वत्थामाच्या डोक्यावर भळभळती जखम कायम राहील. ही जखम बरी करण्यासाठी हळद आणि तेल मागत तो युगानयुगे फिरेल. आजच्या काळातही मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात असलेल्या नर्मदा नदीवरील गौरीघाटावर अश्वत्थामा भटकत असतो, अशी मान्यता आहे.

अश्वत्थामाचे या मंदिरात नेहमीचे पूजन

असिरगड येथील मंदिरामध्ये दररोज सकाळी पूजा केली जाते. परंतु, कोणालाही पूजा कोणी केली हे दिसत नाही. येथील स्थानिकांच्या मते, श्रीकृष्णांनी दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा येथे भटकत असतो. असिरगड किल्ल्यातील तलावात स्नानादी कार्ये उरकून अश्वत्थामा नियमितपणे सकाळी महादेवाच्या पिंडीवर ताजी फुल वाहतात आणि निघून जातात. तर या गावातील स्थानिक माणसांच्या मते, अनेकांनी अश्वत्थामाला पाहिलेही आहे.

मात्र, जी व्यक्ती अश्वत्थामाला पाहते, त्याचे मानसिक संतुलन बिघडते, असा दावाही स्थानिकांकडून केला जातो. त्यामुळे कोणीही सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर या किल्ल्यावर जात नाही. बऱ्याच जणांनी हा प्रयत्न करून बघितला की ही बाब खरी आहे का तर त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला,परंतू निसर्गाच्या शक्तीपूढे विज्ञान किती चालणार .अशी ही सूत्रे या आशिरगड याविषयी Asirgarh fort जुडली गेली आहेत.

Leave a Comment